सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांच्या हस्ते होणार उद्घाटन
देवगड,दि.२१ फेब्रुवारी
जामसंडे सन्मित्र मंडळ, जामसंडे यांच्या वतीने दि २२ व २३ फेब्रुवारी रोजी जिल्हास्तरीय निमंत्रित पुरुष व
महिला खुलागट कबड्डी स्पर्धा स्पर्धांचे आयोजन
जामसंडे सन्मित्र मंडळ, जामसंडेच्या वतीने गेली १६ वर्षे भव्य स्वरुपात निमंत्रित राज्यस्तरीय पुरुष व
महिला खुला गट व जिल्हास्तरीय पुरुष खुलागट कबड्डी स्पर्धेचे आयोजन करीत आहे. गेली ५ वर्षे कबड्डी स्पर्धे
बरोबर जिल्हास्तरीय कुस्ती, कॅरम, बुद्धीबळ व डॉजबॉल स्पर्धेचे आयोजन करणेत आले होते.
यावर्षी मंडळाने जिल्हास्तर पुरुष व महिला(निमंत्रीत) खुलागट कबड्डी स्पर्धा दि. २२ ते २३ फेब्रुवारी
२०२४ रोजी आयोजीत केली असून या स्पर्धेचा उदघाटन सोहळा दि. २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.००
वाजता संपन्न होणार आहे. या उदघाटन सोहळ्याला उदघाटक म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेचे
अध्यक्ष मनिष दळवी लाभले आहेत तर प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष
प्रभाकर सावंत यांची उपस्थिती लाभणार आहे.
स्पर्धा आयोजनासाठी मंडळाला सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशन व देवगड तालुका कबड्डी असोसिएशन,
यांचे मोलाचे सहकार्य लाभणार आहे. कबड्डी स्पर्धा दिवस-रात्र प्रकाशझोतात होणार असून यासाठी २ मैदाने
करणेत येणार आहेत. तसेच प्रेक्षक गॅलरी, मान्यवर गॅलरी, भव्य व्यासपिठ उभारणे आले आहे.
मंडळाचे प्रमुख सल्लागार व आधारस्थंभ माजी आम. अजितराव गोगटे यांचा जन्मदिन सोहळा
दिमाखात साजरा दि.२३ फेब्रु रोजी रात्री ८.०० वाजता साजरा करणेत येणार आहे. तसेच स्पर्धेचा
बक्षीस समारंभ रात्री १०.३० वाजता पार पडणार आहे. या प्रसंगी विविध मान्यवरांची उपस्थिती लाभणार
आहे.
सदर कबड्डी स्पर्धा विद्या विकास मंडळाच्या कै. इंदिराबाई ठाकुर क्रीडा नगरीत होणार आहेत. तर
कॅरम स्पर्धा कै. मोरेश्वर जनार्दन गोगटे सांस्कृतीक भवन मध्ये होणार आहे.
मंडळाच्या स्पर्धांसाठी जिल्ह्याचे पालकमंत्री. रविंद्र चव्हाण यांचेसह मा. आमदार
प्रमोद जठार,आम.
नितेश राणे आणि आम. विजय तथा भाई गिरकर, आम. निरंजन डावखरे, माजी आमदार .
आम. प्रसाद लाड यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.