हिंदू समाजाचे संघटन व एकता यापुढेही टिकून राहिली पाहिजे-डॉ. सुभाष दिघे

मालवण,दि.२१ फेब्रुवारी

अयोध्येत राम मंदिर व्हावे ही सर्व हिंदू समाजाची इच्छा होती. मोठ्या प्रतिकूल परिस्थितीत कार सेवकांनी अयोध्या गाठत बाबरी मशिदीचा ढाचा पाडत राम मंदिर उभारणीच्या दृष्टीने कूच केली होती. कारसेवकांच्या योगदान व बलिदानामुळे आज अयोध्येत राम मंदिर उभे राहिले आहे, याचा एक हिंदू म्हणून आनंद आणि अभिमान आहे, हिंदू समाजाचे संघटन व एकता यापुढेही टिकून राहिली पाहिजे, असे प्रतिपादन डॉ. सुभाष दिघे यांनी मालवण राजकोट किल्ला येथे बोलताना केले.

मालवण मधील सामाजिक कार्यकर्ते व भाजयुमो जिल्हा सरचिटणीस सौरभ ताम्हणकर व त्यांच्या मित्रमंडळाच्यावतीने शिवजयंती निमित्त राजकोट किल्ला येथे अयोध्येतील राम मंदिर उभारणीत महत्वाचे योगदान दिलेल्या आणि १९९० व १९९२ मध्ये कारसेवा बजावलेल्या मालवण मधील कारसेवकांचा सत्कार करण्यात आला. तसेच सौरभ ताम्हणकर मित्रमंडळातर्फे घेण्यात आलेल्या चित्रकला व रांगोळी स्पर्धेचे पारितोषिक वितरण करण्यात आले. या कार्यक्रमास माजी खासदार निलेश राणे, डॉ. मिलिंद कुलकर्णी, डॉ. सुभाष दिघे, सौरभ ताम्हणकर, कारसेवक विलास हडकर, हरी चव्हाण, भाऊ सामंत, श्रीधर काळे, झुंजार हळमळकर, समिर गवाणकर, संजय गवंडी, सावित्री सत्यवान खोत, विनय आंगणे, अरुण सुर्वे, देविदास रावले व इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी कारसेवकांचा मायेची शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व अयोध्या येथे स्थापन करण्यात आलेल्या श्री प्रभू रामलल्ला यांची प्रतिमा भेट देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी अयोध्येचा इतिहास कथन केला. भारतात प्रत्येक हिंदूंच्या हृदयात आणि रोजच्या जीवनात राम भिनला आहे. रामा प्रमाणेच छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदूंचे प्रेरणास्थान आहेत. शिवरायांच्या माहित असलेल्या इतिहासाव्यतिरिक्त त्यांचे वेगळेपण, त्यांचे व्यवस्थापन, संघटन कौशल्य या बाबी जोपर्यंत आपण जाणून घेत नाही तोपर्यंत शिवराय आपल्याला कळणार नाहीत. हिंदवी स्वराज्य स्थापन करतानाच धर्मासह इतर अनेक गोष्टी शिवरायांनी लवचिक ठेवल्याने ते श्रेष्ठ राजा बनले, असेही डॉ. कुलकर्णी म्हणाले. यावेळी विलास हडकर यांनी कारसेवेतील आपले अनुभव कथन करताना हिंदू धर्माचे अधपतन थांबवायचे असेल तर सर्व हिंदूंनी संघटित झाले पाहिजे. राम मंदिर निर्माणाप्रमाणेच हिंदू राष्ट्र निर्मितीसाठी देखील हिंदू समाजाने असेच योगदान द्यावे, असेही ते म्हणाले.

यावेळी निलेश राणे म्हणाले, आपल्या मागच्या पिढीने काय केले हे आजच्या पिढीला माहित नाही, त्यामुळे कार सेवकांचा सन्मान करणे ही कल्पना सुचणे महत्वाचे आहे, यासाठी आपण सौरभ ताम्हणकर मित्रमंडळाचे कौतुक करतो. या सन्मानातून कार सेवकांचे कार्य आपल्या सर्वांसमोर आले आहे. कार सेवकांमुळेच आज राम मंदिर उभे असून याचे श्रेय मात्र कारसेवकांनी कधी घेतले नाही,

कार्यक्रम यशस्वीतेसाठी सौरभ ताम्हणकर मित्रमंडळाचे कार्यकर्ते निशय पालेकर, राकेश सावंत, जुबेर खान, कुणाल खानोलकर, फ्रँसिस फेर्नांडिस, गौरव लुडबे, लौकिक कांदळकर, तुषार वाघ तन्मय पराडकर, आदित्य मोर्जे, सागर कापडोसर यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षय सातार्डेकर यांनी केले. यावेळी सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, धोंडी चिंदरकर, महेश मांजरेकर, संतोष गावकर, विजय केनवडेकर, ललित चव्हाण आदी व इतर उपस्थित होते.