सावंतवाडी दि.२१ फेब्रुवारी
आंबोली गावठणवाडी येथील हिरण्यकेशी ते राघवेश्वर रस्ता परिसरातील शासकीय जागेतील अतिक्रमण केलेली बांधकामे तातडीने पाडण्यासाठी मूळ रहिवाशी ग्रामस्थ, आंबोली गावठणवाडी, फौजदारवाडी व रमाईनगर (पूर्वीची हरिजनवाडी) यांचे निवेदन आणि साखळी उपोषणाच्या पार्श्वभूमीवर खासदार विनायक राऊत यांनी जिल्हाधिकारी यांना पत्र दिले आहे.
जिल्हाधिकारी यांना लिहिलेल्या पत्रात खासदार विनायक राऊत यांनी म्हटले आहे,
आंबोली गावठणवाडी येथील हिरण्यकेशी ते राघवेश्वर रोड दरम्यानचे परिसरात ग्रामस्थांच्या वहिवाटी खालील कबुलायतदार गावकर सदद्य महाराष्ट्र शासन जमिनीवरील अनधिकृतपणे झालेली सर्व अतिक्रमणे अती तातडीने त्वरीत रोखणे व हटवणे बाबत वारंवार संबंधित तक्रारदार शासकीय पातळीवर मागणी करत आहेत. उपोषण सुद्धा झालेले आहे. परंतू याबाबत प्रशासकीय यंत्रणेणे कोणतीही दखल घेतलेली नाही. आपण सदर शासकीय जागेवरील झालेल्या अनधिकृत बांधकामाची गांर्भीयाने दखल घ्यावी. झालेली अनाधिकृत बांधकामे त्वरीत तोडून टाकावीत. तसेच संबंधित अनाधिकृत बांधकाम करणाऱ्या व्यक्तींवर फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी खासदार विनायक राऊत यांनी केली आहे.