नमो महारोजगार मेळावा दि.24 व 25 फेब्रुवारी ऐवजी 29 फेब्रुवारी ते 1 मार्च रोजी

सिंधुदुर्गनगरी,दि.२१ फेब्रुवारी

कौशल्य रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्यावतीने कोकण विभागीय नमो महारोजगार मेळावा दि. 24 व 25 फेब्रुवारी रोजी आयलँड ग्राउंड, ढोकाळी, माजीवाडा, ठाणे, (पश्चिम) येथे आयोजित करण्यात आले होते. त्याऐवजी 29 फेब्रुवारी ते 1 मार्च रोजी नमो महारोजगार मेळावा होणार असल्याची माहिती कौशल्य विकास, राजगार व उद्योजकताचे प्र. सहायक आयुक्त ग.पा. चिमणकर यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार राज्यातील जास्तीत जास्त उमेदवारांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी तसेच उद्योजकांना आवश्यक कुशल मनुष्यबळ प्राप्त होण्यासाठी राज्यातील नामांकित उद्योजक/ इंडस्ट्रिज समवेत आयलँड ग्राउंड, ढोकाळी, माजीवाडा, ठाणे, (पश्चिम) येथे नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे.

या रोजगार मेळाव्यामध्ये राज्यातील विविध औद्योगिक आस्थापना व उद्योजक सहभागी होत असल्याने जिल्यातील नोकरीइच्छुक सर्व उमेदवारांनी या संधीचा लाभ घेण्यासाठी नोंदणीकृत असलेल्या सर्व उमेदवारांनी त्यांचे प्रोफाईल अद्ययावत करावे. रोजगार मेळाव्याच्या दिवशी मुलाखतीकरिता आपला बायोडाटा व इतर आवश्यक शैक्षणिक कागदपत्रांच्या प्रतीसह प्रत्यक्ष उपस्थित रहावे.

उद्योजकांनी आपल्याकडील उपलब्ध रिक्तपदे www.rojgar.mahaswayam.gov.in या पोर्टलवर नमो महारोजगार मेळाव्यामध्ये अधिसूचित करावीत. रोजगार मेळाव्यामध्ये सहभागी होण्यासाठी आपली नोंदणी नसल्यास उद्योजक तसेच उमेदवारांनी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्ग येथे त्वरित संपर्क साधून नोंदणी करावी. रोजगार मेळाव्यात सहभागी होऊन संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क:- ०२३६२-२२८८३५, ९०११३९५३६८, ९४०३३५०६८९ ईमेल आयडी:- sindhudurgrojgar@gmail.com संपर्क करावा