औरंगाबाद अॅथलेटिक्स स्पर्धेत स्मिता गावडे हिचे यश

0

वेंगुर्ला,दि.१३ जानेवारी
औरंगाबाद-छत्रपती संभाजीनगर येथे ‘महाराष्ट्र पैरा अॅथलेटिक्स २०२३‘ स्पर्धा संपन्न झाल्या. यामध्ये साहस प्रतिष्ठान सिधुदुर्गच्या सदस्या तथा वेंगुर्ला कार्यकारिणीच्या खजिनदार तसेच महाराष्ट्र दिव्यांग महिला क्रिकेट संघातील फलंदाज स्मिता सुनिल गावडे हिने १०० मिटर धावणे स्पर्धेत प्रथम क्रमांकासह गोल्ड मेडल आणि भाला फेकमध्ये तिसरा क्रमांक पटकावित ब्रॉन्झ मेडल पटकाविले. तिच्या या यशाबद्दल साहस प्रतिष्ठानतर्फे अध्यक्ष तथा मार्गदर्शक रूपाली पाटील यांनी अभिनंदन केले.