कणकवली दि.२२ फेब्रुवारी(भगवान लोके)

राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहीत्यिक व कलावंत मानधन योजना समितीकडे चालु वर्षामध्ये 350 प्रस्तावर दाखल झाले होते, त्यापैकी खरोखरच गरजु , होतकरु कलाकारांना न्याय देण्याच्या दृष्टीने आम्ही काम करत आहोत. ख-या अर्थाने केंद्रीय मंत्री नारायण राणे,पालकमंत्री रविंद्र चव्हाण,आ.नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम चालू आहे. जिल्ह्यासाठी 100 कलावंतांचे मानधन प्रस्ताव मंजुरीचा कोठा आहे, तो किमान कोकणातील कलाकारांसाठी 200 करण्यात यावा अशी शासनाकडे मागणी केली आहे. ज्या कलाकरांचे प्रस्ताव मंजुर झाले आहेत. त्यां कलाकारांना भाजपकडून पत्र वाटप करण्यात आल्याची माहिती समितीचे अध्यक्ष संतोष कानडे यांनी दिली.

कणकवली येथील केंद्रीयमंत्री नारायण राणे संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते , यावेळी भाजपा तालुकाअध्यक्ष मिलींद मेस्त्री , माजी सभापती दिलीप तळेकर, भाजपा उपाध्यक्ष सोनू सावंत आदी उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध क्षेत्रात काम करणा-या कलाकारांची सेवा करण्याची संधी आपल्याला राणेंच्या माध्यमातून मिळाली आहे. त्यामुळे त्यांच्या सुचनेनुसार जे जेष्ठ वृध्द कलाकार आहेत. त्यांना लवकरात लवकर मानधन चालु व्हावे. यासाठी आमची समिती काम करत आहे. जिल्ह्यातील इतर तालुक्यांपेक्षा कणकवली तालुक्यातील कलाकारांना जास्तीत जास्त न्याय देण्याचा प्रयत्न आहे. ना. नारायण राणे आणि आ. नितेश राणे यांनी मला जबाबदारी मला दिली,भाजपा पक्षाचा कार्यकर्ता असल्यानेच कलाकारांना न्याय देण्यासाठी प्रयत्न केला. आता 100 प्रस्ताव मंजुर केल्याने त्यांच्या बॅंक खात्यावर मानधन जमा झाले आहे. त्यामुळे या सर्व कलाकारांना भारतीय जनता पार्टीकडून मानधन मंजुर प्रस्तावाबाबत पत्र देत त्यांचा सन्मान केल्याचे श्री. कानडे यांनी सांगितले.
कलाकारांना देश पातळीवर काम करतात,त्याला अ गटात 4200 रुपये मानधन तर राज्यातील ब गटात ३८०० रुपये मानधन ,जिल्हास्तर गट २२०० रुपये मानधन ,जिल्ह्यात 100 कलाकारांमध्ये महिला ,अपंग सोडून ६२ कलाकारांना संधी दिली जाते. जो वृध्द कलाकार असेल त्यांनाच न्याय देण्याचा आमचा प्रयत्न आहे.एखादा कलाकारचे निधन झाले तर त्याच्या पत्नीला मानध योजना लागू आहे. त्यात –मूर्तिकार,भजनी, बँड पथक कलाकार पण या योजनेचा लाभार्थी होवू शकतात . असेही संतोष कानडे यांनी सांगितले.