स्वच्छ व सुंदर शाळा स्पर्धेत वेंगुर्ला हायस्कूलचा सहभाग

0

वेंगुर्ला,दि.१३ जानेवारी
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिदे यांच्या संकल्पनेतून घेत येणा-या ‘माझी शाळा, स्वच्छ व सुंदर शाळा‘ या स्पर्धेमध्ये वेंगुर्ला हायस्कूलने सक्रीय सहभाग घेतला असून शालेय परिसराची साफसफाई करून या स्पर्धेतील सहभागाचा शुभारंभ केला.

यावेळी विद्यार्थी, मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. या स्पर्धेंतर्गत विविध व्याख्याने व स्पर्धांचे आयोजन केले जाणार आहे.

फोटोओळी – ‘माझी शाळा, स्वच्छ व सुंदर शाळा‘ या स्पर्धे अंतर्गत वेंगुर्ला हायस्कूलने शालेय परिसराची साफसफाई केली.