सावंतवाडी,दि.२२ फेब्रुवारी
आंबोली अतिक्रमण वर महसूल आणि वन विभागाकडून संयुक्त कारवाई करण्यात येईल.कबुलायतदार गावकर जमीन भूमिपुत्रांना वाटप होण्यासाठी मंत्रालय येथे शासनाकडून वाटप होण्यासाठी लवकरच आठ दिवसात बैठक लावू.संबंधित अतिक्रमण धारकांनी खुलासा हा थातुरमातुर केला आहे बेकायदेशीर नोटरी करून ती अतिक्रमणे झाली आहेत.त्यावर कारवाई ही होणारच आहे असे उपोषणकर्त्याना प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी बुधवारी रात्री आंबोली येथे सांगितले.
आंबोली परिचे भाटले आणि रायाचे भाटले येथील अतिक्रमण हटवण्यासाठी सात दिवसापासून साखळी उपोषणाला ग्रामस्थ बसले आहेत. बुधवारी रात्री याठिकाणी प्रांताधिकारी हेमंत निकम,तहसीलदार श्रीधर पाटील,मंडळ अधिकारी संजय यादव,तलाठी सुमित घाडीगावकर यांनी भेट दिली. बुधवारी सायंकाळी साडे सात वाजता ग्रामस्थांशी प्रांताधिकाऱ्यांनी चर्चा केली.
यावेळी प्रांताधिकारी म्हणाले,संबंधित ठिकाणी बेकायदेशीर नोटरीच्या कागदपत्रे करून अतिक्रमणे झाली आहेत.तहसीलदारांनी त्यांचा खुलासा मागितला त्यात काही तथ्य दिसून आले नाही.सद्यस्थितीत वन हक्क इतर अधिकारात लागले आहे. त्यामुळे वन आणि महसूल विभाग संयुक्त कारवाई करण्यात येणार आहे.२३ आणि ७१ सर्व्हे ची मोजणी २३ तारीखला होणार आहे. त्यामुळे नेमकी कायदेशीर कारवाई करण्यासाठी मिळणार आहे.याठिकाणी ग्रामस्थानी आणि महिलांनी येथील अतिक्रमण हटवल्याशिवाय माघार घेणार नसल्याचे प्रांताधिकारी यांना सांगितले.
याठिकाणी मोठ्या प्रमाणात तिन्ही वाडीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वन क्षेत्रपाल यांनी सदर मोजणी केल्यानंतर पुढील कारवाई होणार असल्याचे सांगितले.प्रांताधिकारी यांनी उप वनसंरक्षक यांच्याकडे देखील चर्चा करून पुढील कारवाई कारवाई करण्यासाठी पत्र देण्यात येणार आहे, असे आश्वासन दिले.