डासांचा, माकडांचा व भटक्या कुत्र्यांचा उपद्रव होत आहे यावर नगरपरिषद मुख्य मुख्याधिकारी आणि प्रशासकांनी खबरदारी घ्यावी अशी मागणी-माजी उपनगराध्यक्ष गोविंद वाडकर

सावंतवाडी दि.२२ फेब्रुवारी

सावंतवाडी शहरांमध्ये डासांचा, माकडांचा व भटक्या कुत्र्यांचा उपद्रव होत आहे यावर नगरपरिषद मुख्य मुख्याधिकारी आणि प्रशासकांनी खबरदारी घ्यावी अशी मागणी माजी उपनगराध्यक्ष गोविंद वाडकर यांनी केली आहे.
शहरातील व दलित वस्ती प्रभागांमधील विकास कामावरही लक्ष देण्यात यावे असे त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. वाडकर यांनी म्हटले आहे, उपरकर स्मशानभूमी दुरुस्तीचे काम गेल्या वर्षीपासून चालू आहे अद्याप पूर्ण झालेले नाही. टाकाऊ साहित्य इतरत्र टाकलेले आहे टाकाऊ साहित्य उचलून जागा मोकळी करावी. प्रेत दहन करण्याच्या प्लॅटफॉर्म खालची जमीन उखडुन गेलेली आहे शहरातील नगरपालिकेच्या मालिकेचे अनेक विविध उपक्रम प्रकल्प सुरू आहेत त्या ठिकाणी देखभाल व्यवस्था नाही सदर देखभाल करणे आवश्यक आहे नगरपालिकेने नगरपालिकेच्या जबाबदार अधिकाऱ्यांनी अशा प्रकल्पावर भेट देणे गरजेचे आहे

सावंतवाडी शहरात अंतर्गत केरकचरा नियमित साफ होत नाही मोतीतलावरील शेजारील फुटपाथ साफ केला जात नाही शहरात कोट्यावधी रुपये खर्च करून नवीन मच्छी मार्केट बांधकाम केले या मच्छी मार्केटची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे मार्केटमध्ये जाण्यासाठी पायऱ्यावर असलेले स्टील रेलिंग तुटून गेलेले आहे त्याचा त्रास जेष्ठ नागरिकांना होत आहे नगरपालिकेच्या आस्थापना वर काम करत असलेले सफाई कामगार यांना जेष्ठतेप्रमाणे तसेच सफाई कर्मचाऱ्यांची उच्च शैक्षणिक करता धारण केलेले आहे त्यांना वर्ग ४ मधून वर्ग ३ मध्ये समाविष्ट करणे, शहरातील नळ कनेक्शन घेण्याकरता चांगल्या रस्त्यांची खुदाई केली जाते ते पूर्ववत केले जात नाहीत त्यामुळे वाहनांना धोकादायक बनले आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
शहरातील रस्त्यावर एलईडी दिवे लावलेले बंद आहेत, बंद असलेले दिवस सुरू करावेत शहरातील विविध सोसायटी मधून बेकायदेशीर सांडपाणी सोडले जात आहे. त्यावर नगरपालिकेच्या आरोग्य विभागाने खबरदारी घेणे गरजेचे आहे. शहरात डासांचा प्रादुर्भाव होत आहेत. माकडानी हैदोस मांडला आहेत फळ झाडांची नुकसानी माकड करत आहेत भटकी कुत्री व इतर मोकाट जनावरांचा सुळसुळाट झाला आहे शहरात नो पार्किंग फलक लावलेल्या आहेत त्या ठिकाणी वाहन पार्किंग केले जाते त्यामुळे वाहतुकीवर परिणाम होतो पोलिसांना त्याबाबत निर्देश देण्यात यावेत, अशी मागणी गोविंद वाडकर यांनी केली आहे.
शहरातील दलित वस्ती मधील दोन वर्ष सातत्याने मागणी होत असलेले सफाई कर्मचाऱ्यांच्या चाळींची दुरुस्ती करावी. डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर समोरील कमानी वरील काही अक्षरे गळून पडलेली आहे ती पुनश्च बसवावीत. समाज मंदिर ला नवीन बोर्ड बसवावा. छत्रपती शाहू महाराज व्यायाम शाळा मध्ये आधुनिक मशीनरी साठी दीपक केसरकर यांनी तीन लाख रुपये निधी मंजूर केलेला होता त्याची कारवाई करावी कोरोना मध्ये सदर व्यायाम शाळेच्या सहाय्य पदावर व्यवस्था करण्यात आली होती ती रिक्त जागा एक कर्मचारी किरण मेस्त्री यांची नियुक्त करावी. कोरोना च्या अगोदर या ठिकाणी बालवाडी चालू होती,ती बालवाडी बंद झाली बालवाडी च्या इमारतीची करून बालवाडी पुनश्च सुरू करून कर्मचाऱ्यांना नियुक्त द्याव्या तसेच १४ एप्रिल २०१४ रोजी डॉ .बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो त्यासाठी इमारतीचे रंगरंगोटी व दुरुस्ती करावी अशी मागणी केली आहे.

सावंतवाडी नगरपालिका अग्निशामक इमारतीचे बांधकाम सुरू आहे. सदर अग्निशामक विभाग करता फायर फायटर म्हणून कर्मचाऱ्यांची आवश्यकता वाटणार आहे त्यासाठी आपल्या कर्मचाऱ्यांमध्ये कार्यरत असल्यास सफाई कर्मचारी व ज्याने फायर फायटर प्रशिक्षण पूर्ण केले आहे त्यांना प्राधान्य द्यावे अशा मागण्या गोविंद वाडकर यांनी केल्या आहेत.