रोटरी क्लबच्या माध्यमातून आपण केलेले दान हे प्रसिद्धीसाठी नाही-ऍड राजीव बिले

 चार्टर नाईट सेलिब्रेशन रोटरी क्लब ऑफ मँगो सिटी देवगड च्या तिसऱ्या वर्धापन उत्साहात साजरा

देवगड,दि.२२ फेब्रुवारी(दयानंद मांगले)
रोटरी क्लबच्या माध्यमातून आपण केलेले दान हे प्रसिद्धीसाठी नसून त्या संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्वसामान्यांच्या सामाजिक उपक्रम मदतीसाठी दिलेले दान आहे. हे पाहणे महत्त्वाचे आहे. दान असे असावे डाव्या हाताने दिलेला उजव्या हाताला समजता कामा नये ,पैसा, रक्त ,शरीर ,नेत्र ही दाने आहेत. परंतु सर्वश्रेष्ठ दान हे द्रव्य दान आहे.
रोटरीचे कार्य करत असताना त्यागाची भूमिका महत्त्वाची असून आपल्या प्रकृतीची काळजी घेणे हेही तितकेच महत्वाचे आहे या करिता रोटरी सदस्यांसाठी आरोग्य शिबीर ही तितकेच महत्त्वाचे आहेत. रोटरी क्लब करता केलेल्या मदतीमुळे आपला आनंद टिकणारा असून टिकणार आहे रोटरी क्लब सदस्यांनी दि फोर वे वेस्ट फलक आपल्या व्यवसायात लावावेत आणि ते फोर वे आपल्या मनात आणले व प्रामाणिकपणे काम केले तर निश्चितपणे आपले आपले हेतू ध्येय साध्य होतात .असे प्रतिपादन जीएस आर ऍड राजीव बिले यांनी देवगड येथे बोलताना केले.
रोटरी क्लब ऑफ मँगो सिटी देवगड चार्टर नाईट सेलिब्रेशन गुरुवार दिनांक २१ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वा. इंद्रप्रस्थ हॉल देवगड या ठिकाणी रोटरी क्लब ऑफ मँगो सिटी देवगड च्या तिसऱ्या वर्धापन दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास विशेष उपस्थिती जीएसआर ऍड राजीव बिले झोनल कॉर्डिनेटर रो. प्रणय तेली असिस्टंट गव्हर्नर राजन बोभाटे डिस्ट्रिकट सेक्रेटरी मेडिकल कॅम्प रो.डॉ विद्याधर तायशेट्ये ,चार्टड प्रेसिडेंट हनीफ मेमन , प्रेसिडेंट प्रवीण पोकळे,ट्रेझरर अनिल कोरगावकर व अन्य रोटरी क्लब मेंबर उपस्थित होते .गणेश वंदना करून या सोहळ्याची सुरुवात करण्यात आली.
तसेच क्लब चे उपाध्यक्ष कै. संजय धुरी व अन्य याना श्रध्दाजली अर्पण करण्यात आली. प्रेसिडेंट रो .प्रवीण पोकळे यांनी अहवाल वाचन करून रोटरी क्लब ऑफ मँगो सिटी मार्फत राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची, स्पर्धांची माहिती दिली.
या वर्धापन दिनाच्या निमित्ताने दोन गरजू व्यक्तींना व्हीलचेअर्स वाटप तसेच ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर क्लब ला मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तसेच त्याचबरो या क्लबचे उपाध्यक्ष कै. संजय धुरी यांच्या कुटुंबीयांना १लाख रु फिक्स डिपॉझिट प्रमाणपत्र सुपूर्द करण्यात येऊन त्यांनी लिहिलेल्या कथा कविता पुस्तकांचे प्रकाशनाची जबाबदारी या क्लबच्या वतीने स्वीकारण्यात आली असल्याचे वरिष्ठ पदाधिकारी यांनी जाहीर केले. तिसऱ्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने व्होकेशनल अवॉर्ड गौरव मूर्ती म्हणून कला क्रीडा नाट्य, शेती क्षेत्रात उत्तुंग भरारी घेणारे शिरगाव येथील सुधीर साटम तसेच गणित विषयात अभ्यासवृत्तीने कार्य करीत असलेले अभ्यासक शिक्षक मुख्याध्यापक शमसुद्दीन अत्तार यांचा सपत्नीक सत्कार करण्यात येऊन सोलर क्षेत्रातील मार्गदर्शक अशोक मुजुमले यांनाही गौरविण्यात आले.
सत्काराला उत्तर देताना सुधीर साटम म्हणाले, आपल्या जीवनातील पहिला पुरस्कार असून विद्यार्थी, शाळा, संस्था ,आणि ग्रामस्थांच्या सहकार्यांमुळेच आज आपण कार्य करीत आहोत. क्रीडा क्षेत्रात विद्यार्थी घडवित असताना या क्षेत्राकडे विद्यार्थ्यांनीही विद्यार्थिनीही पुढे यावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. मुख्याध्यापक शमसुद्दीन अत्तार यांनी सत्काराला उत्तर देताना पुरस्कार हे आपल्या कामाची प्रेरणा देतात. निश्चितपणे शिक्षकी पेशात काम करीत असताना विद्यार्थ्यांची साथ यामुळेच प्रोत्साहन मिळते व पुरस्कार प्राप्त होतात. तसेच नवीन ऊर्जा निर्माण होते व नवनवीन उपक्रम हे राबविण्याची स्फूर्ती मिळते त्यामुळे या पुढील काळात देखील नवनवीन उपक्रम राबविले जातील असे सांगितले.
असिस्टंट गव्हर्नर रो. राजन बोभाटे यांनी आपल्या मार्गदर्शनात संस्थेचे सदस्य किती आहेत हे महत्त्वाचे नसून त्यांच्या सदस्यांचे किंवा क्लबचे कार्य महत्त्वाचे आहे? रोटरी क्लब ऑफ मँगो सिटी यांच्या माध्यमातून राबविण्यात आलेले उपक्रम त्यांचे समाजपयोगी करण्यात आलेले कार्य हे निश्चितपणे वाखाण्याजोगे आहे असे असे सांगून या क्लब मध्ये आल्यानंतर कामाला चालना मिळते .क्वालिटी पेक्षा क्वांटीटी महत्त्वाचे आहे त्यातप्रमाणे नियमितपणा ठेवणे आवश्यक आहे .रोटरी हा परिवार आहे हीच रोटरीची ओळख आहे. असे त्यांनी आवर्जून सांगितले. रो.अशोक मुजुमले यांनीही या निमित्ताने मार्गदर्शन केले. या तिसऱ्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उमेश पाटील यांनी रोटरी क्लब ऑफ मॅंगो सिटी चे सदस्यत्व प्राप्त केले त्यांचा या निमित्ताने परिवारात स्वागत करण्यात आले. झोनल कॉर्डिनेटर रो.प्रणय तेली यांनी आपल्या मार्गदर्शनात रोटरी क्लब ऑफ मँगो सिटी देवगड विधायक कामे जोमाने करत असून त्यांच्या विविध उपक्रमातून निश्चितपणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात रोटरी क्लब मँगो सिटी ने नावलौकिक प्राप्त केला आहे. या क्लबचे प्रेसिडेंट प्रवीण प्रवीण पोकळे यांनी सहकुटुंब सिंगापूर येथे जाण्याचा पहिला मान प्राप्त केला असे सांगून शुभेच्छा व्यक्त केल्या या सोहळ्यास कुडाळ, कणकवली ,वैभववाडी ,मालवण व अन्य तालुक्याचे रोटरी पदाधिकारी उपस्थित होते.असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद करून शुभेच्छा व्यक्त केल्या.
सोहळ्याचे सूत्रसंचालन रो.अनिल गांधी, रो.सौ मनस्वी घारे, रो.अनुश्री पारकर,रो सौ. शामल पोकळे यांनी केले आभार रो.सौ मनीषा डामरी यांनी मानले.