मसुरे,दि.२२ फेब्रुवारी(झुंजार पेडणेकर)
बॅ नाथ पै सेवांगण कट्टा व
क्रियेटिव्ह क्लासेस कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने
शिवजयंती साजरी करण्यात आली.
प्रारंभी शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. बॅ नाथ पै सेवांगणचे विश्वस्त दीपक भोगटे म्हणाले, शिवराय हे सर्वसामान्य रयतेचे राजा होते. त्यांच्या राज्यात स्त्रीयाना अत्यंत आदराची वागणूक दिली जात असे. शेतक ऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय शिवरायांनी घेतले होते. शिवरायानी सर्व जातीच्या लोकाना राज्यकारभात समाविष्ट करून घेतले होते आणि म्हणूनच शिवरायांची जयंती आजही उत्साहात साजरी केली जाते. त्यांच्या विचाराचा आणि आचाराचा अंगीकार सर्वानी करणे हिच त्यांना
आदरांजली ठरेल असे सांगितले.
क्रियेटीव्ह क्लासचे संचालक मनोज काळसेकर यानी शिवरायांचा दूरदृष्टीपणा
त्यांची धाडशी वृत्ती याची मुलाना माहिती करून दिली.माजी समाजकल्याण सभापती बाळ महाभोज यानी हिंदवी स्वराज्य हे शिवरायांचे स्वप्न होते व त्यांनी ते साकार केले याची माहिती दिली.
स्वरा गिरकर, आर्या वायंगणकर यानीही मनोगत व्यक्त केले.
भूमिका चव्हाण, भार्गवी नांदोसकर, हर्षदा मालंडकर, आदिश्री कुबल, प्रज्ञा मेस्त्री, किमया झोरे, आर्या राऊळ, समृद्धी राऊळ, चिन्मय परब, ग्रिष्मा केरकर, शार्दूल रेवडेकर, परी वायंगणकर
यांनी शिवरायांच्या जीवनावर आधारीत पथनाट्य सादर केले.
सर्व विद्यार्थ्याना नरेंद्र दाभोळकर यांची
अंधश्रध्दा निर्मूलनावरील पुस्तके भेट देण्यात आली.
यावेळी बॅ नाथ पै सेवांगणचे कार्याध्यक्ष किशोर शिरोडकर, बापू तळावडेकर, बाळ महाभोज, दीपक भोगटे, ग्रा. प सदस्य वंदेश ढोलम, दर्शन म्हाडगुत, निलेश हडकर, वेंगुर्लेकर व विद्यार्थी उपस्थित होते.