वेंगुर्ला,दि.१३ जानेवारी
सिधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक असोसिएशन वेंगुर्ला तालुका अंतर्गत प्राथमिक शिक्षक, शिक्षिका, केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी तसेच कुटुंब निवृत्त वेतनधारक यांचा ‘आनंद मेळावा‘ बुधवार दि. १७ जानेवारी रोजी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत साई मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आला आहे.
सिधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक असोसिएशन वेंगुर्ला तालुका अध्यक्ष दिलीप प्रभूखानोलकर यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश दळवी, भरत आवळे, किशोर नरसुले, जिहा सचिव सुंदर पारकर, जिल्हा सल्लागार सुधाकर खानोलकर, तालुका सल्लागार सत्यवान पेडणेकर व कैवल्य पवार यांच्या उपस्थितीत होणा-या या मेळाव्याला सिधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक असोसिएशन जिल्हा अध्यक्ष सावळाराम अणावकर व जिल्हा प्रतिनिधी संघटनात्मक मार्गदर्शन करणार आहेत. तर ७५ वर्षे पूर्ण झालेल्या सभासदांचा सन्मानही केला जाणार आहे. तरी यावेळी उपस्थित रहावे असे आवाहन वेंगुर्ला तालुका अध्यक्ष दिलीप प्रभूखानोलकर व सचिव राजेंद्र बेहरे यांनी केले आहे.