न्यायमूर्ती भुषण गवई,केंद्रीय मंत्री नारायण राणे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहणार उपस्थित-अध्यक्ष ऍड देवानंद गोरे
देवगड,दि.२२ फेब्रुवारी
देवगड येथील दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी न्यायालय नवीन इमारतीचा कोनशीला समारंभ शनिवार दि .२४ फेब्रुवारी रोजी स.१०.३० वा.सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली चे न्यायमूर्ती श्री. भुषण रा. गवई यांच्या शुभहस्ते, सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगमंत्री भारत सरकार श्री. नारायण राणे ,उपमुख्यमंत्री तथा विधी व न्याय मंत्री महाराष्ट्र राज्य श्री. देवेंद्र गं फडणवीस यांच्या सन्माननीय उपस्थितीत ,मुख्य न्यायाधीश उच्च प्रमुख पाहुणे मुख्य न्यायाधीश उच्च न्यायालय ,मुंबई ,न्यायमूर्ती श्री देवेंद्र कुमार उपाध्याय,
सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री सिंधुदुर्ग श्री.रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत, उच्च न्यायालय मुंबई न्यायमूर्ती श्री.नितीन रु बोरकर यांच्या अध्यक्षतेखाली, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सिंधुदुर्ग हेमंत भ. गायकवाड यांच्या उपस्थितीत जुनी दिवाणी न्यायालय देवगड इमारत परिसर, शासकीय गोडाऊन जवळ ,पवनचक्की रोड या ठिकाणी संपन्न होणार आहे .तरी या सोहळ्यास उपस्थित रहावे असे आवाहन देवगड वकील संघाचे अध्यक्ष ऍड देवानंद रा गोरे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केले .
.यावेळी जिल्हा बार असोसिएशनचे सदस्य ऍड रुपेश राणे , बार असोसिएशनचे जेष्ठ सदस्य ऍड अविनाश माणगावकर ऍड अजित गोगटे, ऍड प्रकाश बोडस व वकील संघ देवगडचे अन्य सदस्य उपस्थित होते.
देवगड येथील दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी न्यायालय नूतन इमारत हे तीन मजली पूर्ण अद्ययावत ,वेगवेगळे स्वतंत्र कक्ष,विभाग , निर्माण होणार आहेत.