निवृत्त ग्रामसेवक सुभाष पेडणेकर(भाऊ) यांचे दुःखद निधन !

0

फोंडाघाट,दि.१३ जानेवारी (संजय सावंत)
फोंडाघाट बाजारपेठेत राहणारे सर्वपरिचित निवृत्त ग्रामसेवक सुभाष यशवंत पेडणेकर उर्फ भाऊ ( वय ७८ वर्षे) यांचे काल सायंकाळी सहा निघणे वाजता च्या दरम्याने राहत्या घरी वृद्धापकाळातील अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
कै.सुभाष पेडणेकर हे संपूर्ण तालुक्यात भाऊ या नावाने ते सर्वत्र सुपरीचित होते. त्यांनी मणचे, घोणसरी, तिवरे – डामरे- कोंड्ये, आणि फोंडाघाट मध्ये ग्रामसेवक म्हणुन अगदी कुशलपूर्वक काम केले. प्रशासकीय कामाची अभ्यासपूर्ण हातोटी, अधिकारी वर्गाशी प्रामाणिक, विश्वासार्ह वर्तन तसेच गोरगरिबांसाठी जिव्हाळा,अशा त्यांच्या कामाच्या पद्धतीमुळे त्यांचा लोकसंग्रह अफाट आणि सौदार्यपूर्ण होता. किंबहुना त्यांनी आपला कार्यकाळ आजच्या प्रशासकीय कामासाठी मार्गदर्शक असा केला होता. त्यांच्या निधनाबद्दल पंचक्रोशी मध्ये दुःख व्यक्त होत आहे.
त्यांचे पश्चात पत्नी,एक मुलगा, दोन मुली, भाऊ -बहिणी असा परिवार आहे. फोंडाघाट हायस्कूलचे विद्यार्थीप्रिय शिक्षक महेश पेडणेकर सर यांचे ते वडील होत. रात्री उशिरा यांचे अंत्ययात्रेत सर्व स्तरातील मित्रपरिवार- ग्रामस्थ, यांनी सहभागी होऊन त्यांना आदरांजली वाहीली…..