तळेरे,दि.२२ फेब्रुवारी
ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या वतीने देवरुख पोलीस स्टेशनचे नूतन पोलीस निरीक्षक म्हणून पदभार स्विकारलेले तसेच यापूर्वी कणकवली येथे कार्यरत असलेले अमितकुमार यादव यांचा संघटनेच्या वतीने सत्कार करुन स्वागत करण्यात आले.
यावेळी संघटनेच्या शिष्टमंडळाने देवरुख पोलीस स्टेशनला सदिच्छा भेट देऊन नूतन पोलिस निरीक्षक अमित कुमार यादव यांचा संघटनेचे सन्मान चिन्ह व गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी संघटनेचे कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष तेजस भोपळकर, वैभववाडी तालुका उपाध्यक्ष प्रणव बांदिवडेकर, सचिव विजय आंब्रे, संगमेश्वर तालुकाध्यक्ष पंढरीनाथ मोहिरे, संगमेश्वर तालुका सचिव शांताराम सुवरे आदी उपस्थित होते.