भारतीय मजदूर संघाचे कार्याध्यक्ष भगवान साटम यांनी दिली माहिती
कणकवली २२ फेब्रुवारी (भगवान लोके)
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत जीवित नोंदीत बांधकाम कामगारांना गृहउपयोगी ३० भांड्यांचा संच बाबत कोणी एजंट जर कामगारांची दिशाभूल करून अर्ज भरून घेत असतील व कामगारांची फसवणूक करत असतील तर त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन सरकारी कामगार अधिकारी तथा सहाय्यक कामगार आयुक्त संदेश आयरे यांनी
भारतीय मजदूर संघाच्या पदाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती भारतीय मजदूर संघाचे कार्याध्यक्ष भगवान साटम यांनी दिली.
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत जीवित नोंदीत बांधकाम कामगारांना गृहउपयोगी ३० भांड्यांचा संच आम्ही मिळवून देतो असे सांगून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही एजंट बांधकाम कामगारांचे अनधिकृतरित्या अर्ज भरून घेत असून बांधकाम कामगारांकडून पैशाचीही मागणी करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर, याबाबत वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी भारतीय मजदूर संघाच्या पदाधिकाऱ्यानी सरकारी कामगार अधिकारी तथा सहाय्यक कामगार आयुक्त संदेश आयरे यांची सिंधदुर्ग मुख्यालय येथे भेट घेऊन याबाबतची वस्तुस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी अद्याप सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांधकाम कामगारांना गृहउपयोगी वस्तू संच वाटप सुरु करण्याबाबत या कार्यालयाकडून आदेश देण्यात आलेले नाहीत. असे सांगून बांधकाम कामगारांकडून कोणत्याही प्रकारचे अर्ज भरून घेण्यासाठी या कार्यालयाकडे कोणतेही अर्ज प्राप्त नसल्याचे सांगितले. अश्याप्रकारे कोणी एजंट जर कामगारांची दिशाभूल करून अर्ज भरून घेत असतील व कामगारांची फसवणूक करत असतील तर त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन भारतीय मजदूर संघाच्या पदाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती कार्याध्यक्ष भगवान साटम यांनी दिली.
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत महाराष्ट्र राज्यात सुमारे १० लाख बांधकाम कामगार नोंदीत असून, सदर बांधकाम कामगारांना गृहउपयोगी ३० भांड्यांचा संच देण्याबाबत महाराष्ट्र शासन व बांधकाम मंडळ यांच्याकडून आदेश काढण्यात आला आहे व महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये गृहउपयोगी वस्तू संचाचे बांधकाम कामगारांना वाटपही सुरु करण्यात आले आहे. या वस्तू संचामध्ये ताट, वाट्या, पाण्याचे ग्लास, पातेले, चमचा, पाण्याचा जग, डबा, परात, प्रेशर कुकर, कढई व स्टीलची मोठी टाकी आदी प्रकारच्या वस्तू वाटप होणार आहेत. सदर वस्तू बांधकाम कामगारांना वाटप होण्या अगोदरच काही एजंट कार्यरत झाले असून कामगारांकडून चुकीच्या पद्धतीने अर्ज तयार करून भरून घेत आहेत. व कामगारांकडे पैशाचीही मागणी करत असल्याची माहिती भारतीय मजदूर संघास मिळाल्यानंतर याबाबत वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी सरकारी कामगार अधिकारी तथा सहाय्यक कामगार आयुक्त संदेश आयरे यांची सिंधदुर्ग मुख्यालय येथे भारतीय मजदूर संघाच्या पदाधिकाऱ्यानी भेट घेऊन चर्चा केली असता श्री. आयरे यांनी गृहउपयोगी वस्तू संच बांधकाम कामगारांना वाटप सुरु करण्यासंदर्भात या कार्यालयाकडून अद्याप आदेश देण्यात आलेले नाहीत. तसेच बांधकाम कामगारांकडून या संदर्भातले अर्ज भरून घेण्यासाठी या कार्यालयाकडून वितरीत करण्यात आलेले नाहीत किंवा प्राप्तही झालेले नाहीत असे सांगितले. अश्याप्रकारे कोणी अर्ज तयार करून बांधकाम कामगारांची दिशाभूल करत असल्यास संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले. याबाबत जिल्ह्यातील बांधकाम कामगारांना मिळणारा गृहउपयोगी ३० भांड्यांचा संच हा पूर्णतः मोफत वाटप करण्यात येणार आहे. कोणी एजंट बांधकाम कामगारांकडून चुकीचे अर्ज भरून घेत असल्यास व पैशाची मागणी करत असल्यास थेट भारतीय मजदूर संघाशी व सरकारी कामगार अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन कार्याध्यक्ष भगवान साटम यांनी केले आहे.