सावंतवाडी,दि.२२ फेब्रुवारी
अनिल भिसे मित्रमंडळातर्फे क्रिडा तपस्वी कै. शिवाजीराव भिसे (सर) यांच्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक सादीया सय्यद हीने पटकावला. पृथ्वीवर पर्यावरणामुळे होत असलेले बदल दर्शविणारे चित्र काढले होते.
दरवर्षीप्रमाणे यंदाही अनिल भिसे मित्रमंडळातर्फे क्रिडा तपस्वी कै. शिवाजीराव भिसे सर यांच्या स्मृतीदिना निमित्त इयत्ता १ ली व २ री च्या लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते . ही स्पर्धा जगन्नाथराव भोसले बालोद्यान सावंतवाडी येथे आयोजित केली होती.
यावेळी शंभर पेक्षा जास्त विद्यार्थानी सहभागी होवून चित्र काढली. चित्रासाठी कागद व रंग आयोजकांनी पुरविले होते.
या स्पर्धेत प्रथम क्रमांक- सादिया सय्यद,
दुतीय क्रमांक – सार्थक मालवणकर,
तृतीय क्रमांक – युवराज सावरवाडकर,
उत्तेजनार्थ क्रमांक – हुमेरा बागवान, सोनाक्षी मालवणकर, दर्श पडते, प्रार्थना नाईक, यांना मिळाले.
या स्पर्धेमध्ये सहभागी प्रत्येक स्पर्धकाला प्रमाणपत्र व पहिल्या तीन क्रमांकांना रोख बक्षिसे व प्रमाणपत्र देण्यात आले . तसेच उत्तेजनार्थ चार बक्षिसे देण्यात आली आहेत.
यावेळी बक्षीस वितरण पत्रकार अभिमन्यू लोंढे, पत्रकार अनंत जाधव, फोटो ग्राफर अरुण भिसे, अनिल भिसे, पत्रकार अनंत जाधव,हेमंत केसरकर, संजू शिरोडकर,समिर वंजारी,पत्रकार राजेश मोंडकर, पत्रकार प्रविण मांजरेकर, पत्रकार दीपक गांवकर,प्रशांत वाळके, कुंदन टोपले,सौ रिया भिसे,मारिया फर्नांडिस, अजय मडगावकर,कु तानिया भिसे, ओवी भिसे, किशोर पडते, आदींच्या उपस्थित करण्यात आले.