जिल्हा माहिती कार्यालयातील रद्दी विक्रीसाठी दरपत्रके सादर करावेत

सिंधुदुर्गनगरी,दि.२२ फेब्रुवारी

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या सिंधुदुर्ग येथील जिल्हा माहिती कार्यालयातील जुनी वृत्तपत्राची विक्री करावयाची असल्याने त्यासाठी वृत्तपत्र रद्दी खरेदी विक्रीदार यांच्याकडून गुरुवार दि. 29 फेब्रुवारी 2024 पर्यंत दरपत्रके मागविण्यात येत आहे. सदरचे वृत्तपत्र रद्दी पाहणी कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत करता येईल. रद्दी विकत घेऊ इच्छिणाऱ्यांनी जिल्हा माहिती कार्यालय, नवीन प्रशासकीय इमारत, सी ब्लॉक, पहिला मजला सिंधुदुर्गनगरी ता. कुडाळ जि.सिंधुदुर्ग येथे समक्ष भेट देऊन रद्दीची पाहणी करावी व दरपत्रक सादर करावे, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक 02362 228859 यावर संपर्क साधावा.