मालवण,दि.२२ फेब्रुवारी
मालवण येथील सामाजिक कार्यकर्ते सौरभ ताम्हणकर व मित्रमंडळातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेत आभा उमेश परब, रुद्राक्ष अरुण विठ्ठलकर व साई पारकर तर रांगोळी स्पर्धेत पार्थ मेस्त्री यांनी प्रथम क्रमांक पटकावीला. विजेत्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
शिवजयंती निमित्त सौरभ ताम्हणकर मित्रमंडळातर्फे चित्रकला व रांगोळी स्पर्धा १८ फेब्रुवारी रोजी राजकोट किल्ला येथे संपन्न झाली. स्पर्धेचे उदघाटन सर्व स्पर्धक व आयोजक तसेच राजकोट किल्ला परिसरातील स्थानिक नागरिकांसमवेत किल्ल्याच्या प्रवेशद्वार ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या पर्यंत शिवरायांच्या जयघोषात रॅली काढून त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून करण्यात आले. चित्रकला स्पर्धा राजकोट किल्ल्यावर संपन्न झाली व रांगोळी स्पर्धा मेढा राजकोट येथील मौनीनाथ मंदिरात संपन्न झाली. चित्रकला व रांगोळी स्पर्धेत एकूण ११२ स्पर्धक सहभागी झाले होते.
स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे- चित्रकला स्पर्धा – लहान गट – प्रथम- आभा उमेश परब, द्वितीय – अथर्व प्रसाद अडवलकर, तृतीय- प्रथमेश प्रमोद चव्हाण, मोठा गट – प्रथम -रुद्राक्ष अरुण विठ्ठलकर, द्वितीय – पार्थ मेस्त्री, तृतीय – मयुरेश वायगणकर, खुला गट – प्रथम – साई पारकर, द्वितीय – साईराज बादेकर, रांगोळी स्पर्धा – खुला गट – प्रथम – पार्थ मेस्त्री, द्वितीय- राहुल चव्हाण.
सर्व विजेत्या स्पर्धकांना प्रमाणपत्र, रोख रक्कम व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. तर सर्व सहभागी स्पर्धकांना भेटवस्तू व सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण कलाशिक्षक बी. जी. सामंत व समीर चंदरकर यांनी केले. यावेळी मंडळाच्या वतीने परीक्षकांचा सत्कार करण्यात आला.
चित्रकला व रांगोळी स्पर्धेसाठी सुशांत तायशेये, कला शिक्षिका सोनाली फाटक, अदिती ठाकूर, मोरेश्वर गोसावी यांचे सहकार्य लाभले. तसेच सौरभ ताम्हाणकर मित्रमंडळाचे राकेश सावंत, जुबेर खान, कुणाल खानोलकर, निश्चय पालेकर, लौकिक कांदळकर यांच्या सह राजकोट किल्ला येथील स्थानिक नंदू देसाई, मंदार परब, हेमंत रामाडे, यश कवटकर, अथर्व काळसेकर, अथर्व चिंदरकर, पराग परब, गिल्बट फर्नांडीस, बंटी खंदारे, कौशल जोशी, भाई चिंदरकर, देवेश भाबल, मानस मुणगेकर यांचेही सहकार्य लाभले.
या दरम्यान सौरभ ताम्हणकर मित्रमंडळातर्फे यापूर्वी महिलांकरिता घेण्यात आलेल्या ऑनलाईन तुळस सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरणही पार पडले. या स्पर्धेमध्ये एकूण २१ स्पर्धकांनी आपला सहभाग दर्शविला होता. यामध्ये प्रथम क्रमांक अंजली आंबेरकर, द्वितीय क्रमांक यज्ञिका वराडकर, तृतीय क्रमांक – श्रेया मांजरेकर यांनी मिळविला. सर्व स्पर्धकांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.