देवगड,दि.२३ फेब्रूवारी
येथील शेठ म.ग. हायस्कूल मध्ये इतिहास विषय समितीमार्फत विद्यार्थ्यांनी बनविलेल्या किल्ल्यांचे प्रदर्शन आणि स्पर्धा आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्याॲड. अविनाश माणगावकर यांनी वरील गौरव उद्गार काढले. यावेळी व्यासपीठावर माजी मुख्याध्यापक व स्थानीय समिती सदस्य चंद्रकांत शिंगाडे, मुख्याध्यापक महादेव घोलराखे या स्तुत्य उपक्रमाचे प्रमुख सहाय्यक शिक्षिका आफरीन बांगी(पठाण) आदी उपस्थित होते.
शाळेच्या गुरुदक्षिणा प्रेक्षागृहात आयोजित केलेल्या या प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी प्रतापगड, लोहगड, शिवनेरी ,सिंधुदुर्ग किल्ला, रायगड , जंजिरा तोरणागड इत्यादी अनेक किल्ल्यांच्या प्रतिकृती विद्यार्थ्यांनी मातीचा तसेच कागदाच्या लगद्याचा,पुट्ट्यांचा आदी साहित्याचा वापर करून बनविलेल्या पाहावयास मिळाल्या. त्याचबरोबर संबंधित किल्ल्यांची माहिती देखील विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाला भेट देणाऱ्या व्यक्तींना करून दिली.
ॲड. अविनाश माणगावकर यांनी या उपक्रमामध्ये किल्ले बनविलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करून उपक्रमाची देखील प्रशंसा केली. माजी मुख्याध्यापक चंद्रकांत शिंगाडे यांनी या प्रकारचे उपक्रम शाळेत होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. मुख्याध्यापक घोलराखे यांनी उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या प्रदर्शनामध्ये 22 किल्ल्यांच्या प्रतिकृती विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या होत्या. या प्रदर्शनास भेट देणाऱ्या पालक वर्गाने देखील उपक्रमाचे तसेच विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीचे व कौशल्याचे कौतुक केले. या प्रदर्शनास स्थानीय समिती सदस्य मिलिंद कुबल यांनी भेट देऊन उपक्रमाचे व विद्यार्थी वर्गाचे कौतुक केले. देवगड तालुका मराठा समाज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी देखील या प्रदर्शनास भेट देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. शाळेचे माजी मुख्याध्यापक संजीव राऊत यांनी देखील या प्रदर्शनास आवर्जून भेट दिली. या कार्यक्रमाचे निवेदन इयत्ता आठवीतील राज्ञी कुळकर्णी हिने तर आभार सानवी जंगले हिने मानले.