सुंदरवाडी रिक्षा चालक-मालक सहकारी पतसंस्थे च्या अध्यक्षपदी श्रीरंग म्हापसेकर यांची बिनविरोध निवड

सावंतवाडी दि.२३ फेब्रुवारी
सुंदरवाडी रिक्षा चालक-मालक सहकारी पतसंस्थे च्या अध्यक्षपदी श्रीरंग म्हापसेकर व उपाध्यक्षपदी पॅट्रिक डिसोजा यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यासाठी गुरुवारी बैठक झाली.
यावेळी अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची बिनविरोध निवड झाल्यामुळे सर्व संचालक यांचे अध्यक्ष उपाध्यक्ष यांनी स्वागत केले आहे. पतसंस्थेची वार्षिक निवडणूक टाळून सर्व सभासदांनी निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न केले. निवडणूक निर्णय अधिकारी श्री.आरोंदेकर यांच्या उपस्थितीत मावळचे अध्यक्ष शामसुंदर नाईक यांनी नवीन अध्यक्ष श्रीरंग म्हापसेकर व पूर्वीचे उपाध्यक्ष पॅट्रिक डिसोजा यांची फेर निवड बाबत प्रस्ताव मांडला..
यावेळी श्री यावेळी उपाध्यक्ष पॅट्रिक डिसोजा यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे स्वागत करून सर्व संचालक सभासदांना शुभेच्छा दिल्या. पतसंस्थेच्या पुढील वाटचालीस आणि योजनांचे महत्त्व उपस्थितांना पटवून देत मार्गदर्शन केले.
नवनियुक्त अध्यक्ष श्रीरंग म्हापसेकर यांनी सर्वांचे स्वागत करून शुभेच्छा देत पतसंस्थेच्या वाटचालीबाबत विवेचन केले. पतसंस्थेच्या वाटचालीस ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्याबाबत धन्यवाद दिले .यावेळी संचालक गजानन सावंत, भाऊ पाटील ,रवींद्र सावंत, जयवंत टंगसाळी ,शामसुंदर नाईक ,महादेव परब व सर्व कर्मचारी वर्ग ,व्यवस्थापक नवनाथ परब आदी उपस्थित होते. त्यांनी सर्वांचे आभार मानले.