आचरा–अर्जुन बापर्डेकर
इनामदार श्रीदेवी रामेश्वर संस्थानाच्या रामेश्वर मंदिर देवस्थान समितीने भाजप नेते निलेश राणे यांची मालवण येथे भेट घेऊन मंदिर जिर्णोद्धारासाठी
सहकार्याबाबत चर्चा केली. यावेळी मंदिर जिर्णोद्धारासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याची ग्वाही निलेश राणे यांनी दिली .
आचरा येथील रामेश्वर देवस्थान जिर्णोद्धारासाठी आवश्यक निधी संकलनासाठी देवस्थान समिती ने कंबर कसली आहे.यासाठी आचरा गावात वाडीवाडीवर तसेच मुंबई येथे चाकरमान्यांच्या बैठका घेतल्या आहेत.यादृष्टीने देवस्थान समिती अध्यक्ष मिलिंद मिराशी यांनी लोकप्रिय भाजप नेते निलेश राणे यांची मालवण येथे भेट घेतली.यावेळी मंदिर जिर्णोद्धारासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याची ग्वाही राणे यांनी दिली असल्याचे अध्यक्ष मिलिंद मिराशी यांच्या कडून स्पष्ट करण्यात आले.यावेळी त्यांच्या सोबत जिल्हा बँक संचालक बाबा परब,माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर,दिपक पाटकर, आर्किटेक्ट किरण केळूस्कर, देवस्थान कारकून बाबा देसाई,रुपेश साटम आदी उपस्थित होते.