सावंतवाडी,दि.२३ फेब्रुवारी
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी लोकसभा सभापती मनोहर पंत जोशी हे माझ्या शिवाजी चौक येथील सावंतवाडी तालुका शिवसेना मध्यवर्ती कार्यालय शिवसेनेत शाखेच्या उद्घाटनासाठी १९९६ मध्ये आले होते असे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी सांगून त्यांना श्रद्धांजली वाहिली.
शिवसेनेची मुलुख मैदान तोफ म्हणून ओळखले जाणारे सरांचा वक्तशीरपणा, स्पष्टवक्तेपणा ,हजरजबाबीपणा आम्ही पाहिला.शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर पंत जोशी यांनी महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाला रोजगार मिळावा यासाठी कोहिनूर इन्स्टिट्यूट सुरू केली. या माध्यमातून त्यांनी अनेक मराठी तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये ते लोकसभा सभापती म्हणून होते . त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने काम केलं एकदा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे एका कार्यक्रमात बोलत असताना असंसदीय भाषेमध्ये बोलले. स्टेजवरून उतरल्यानंतर पत्रकारांनी विचारलं या मताशी तुमचं मत काय हजरजबाबी मनोहर पंत पटकन म्हणाले मी काही ऐकलं नाही शिवसेनेचे एकनिष्ठ राहिले बाळासाहेबांचे विश्वासू, सतत रुबाबात वावरणारा हा नेता आज काळाच्या पडद्याआड झाला त्यांना विनम्र आदरांजली अर्पण करतो असे साळगावकर यांनी सांगितले.