शहरात गरज नसताना प्राणघातक गतिरोधक घालण्यात आले-माजी नगरसेवक सुरेश भोगटे

सावंतवाडी,दि.२३ फेब्रुवारी 
सावंतवाडी शहरात गरज नसताना प्राणघातक गतिरोधक घालण्यात आले आहेत ते तात्काळ हटविण्याची मागणी माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन केली.
सावंतवाडी शहरातून जाणाऱ्या जुन्या मुंबई गोवा महामार्गावर ठिकठिकाणी गतिरोधक घालण्यात आले आहेत सकाळ सुमारे ५० नागरिकांनी रेणुका हाॅटेल समोरील गतिरोधकाचे काम रोखले होते असे सुरेश भोगटे यांनी सांगितले.

याबाबत सार्वजनिक बांधकाम सावंतवाडी यांना निवेदन माजी नगरसेवक सुरेश भोगटे, सुधीर पराडकर, महेश नार्वेकर, स्वप्निल कामते, दीपक सावंत, संतोष खंदारे व अन्य मान्यवरांनी दिले.

सावंतवाडी शहरात राजा शिवाजी चौक, रेणुका हाॅटेल समोर, तीन मुशी रस्त्यावर अशा ठिकठिकाणी अवास्तव गतिरोधकामुळे अपघात होण्याची शक्यता आहे त्यामुळे प्राणघातक गतिरोधक हटविण्यात यावेत अशी मागणी सुरेश भोगटे, सुधीर पराडकर आदींनी केली आहे.