0

मुंबई,दि.१३ जानेवारी
पंतप्रधान ना. नरेंद्र मोदी यांनी कालच उदघाटन केलेल्या अटल सेतूवरुन म्हणजेच शिवडी – न्हावासेवा पुलावरुन वाहतूक सुरु झाली आहे. मात्र या अटल सेतूच्या टोलचे रेटकार्ड वाहून वाहन चालक अचंबित झाले आहेत. महिन्याचा टोल पास तब्बल ७९ हजार रुपयांचा आहे.
अटल सेतूमुळे मुंबई ते नवी मुंबई शहराला जोडणारा नवा पर्याय उपलब्ध झाला आहे. मात्र तेथील टोलचे दर पाहून वाहन चालक थक्क होतात. शिवडी – न्हावाशेवा अटल सेतूवर कमीत कमी रु. २५० चा टोल आकारला जातो. या मार्गावर अवजड वाहनांसाठी मासिक पास तब्बल रु. ७९ हजार इतका आहे.