त्रिंबक येथील रामेश्वर मंदिर जिर्णोद्धार, कलशारोहण सोहळा २६फेब्रूवारी पासून

आचरा,दि.२३ फेब्रुवारी (अर्जुन बापर्डेकर)
मालवण तालुक्यातील त्रिंबक गावची ग्रामदेवता श्री देव रामेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार कलशारोहण व लोकार्पण सोहळा २६फेब्रूवारीपासून सुरू होत आहे.१मार्च पर्यंत चालणारया या सोहळ्यात विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन जिर्णोद्धार समिती कडून करण्यात आले आहे.
यात सोमवार २६फेब्रूवारी रोजी सकाळी ९वाजता कलश मिरवणूक काढण्यात येणार आहे.रात्रौ८वाजल्यापासून स्थानिक भजने . मंगळवार २७फेब्रूवारीला सकाळी सात पासून धार्मिक विधी सुरू.दुपारी२वाजता महाप्रसाद.रात्रौ सात वाजता सुस्वर भजने, सांस्कृतिक कार्यक्रम रात्री १०वाजता दशावतारी नाट्य प्रयोग.बुधवार२८रोजी सकाळी आठ पासून धार्मिक विधी होम यज्ञ, दुपारी महाप्रसाद, सायंकाळी सात नंतर सुस्वर भजने,रात्रौ१० डबलबारी भजनाचा जंगी सामना, गुरुवार२९फेब्रूवारी रोजी सकाळी आठ वाजल्यापासून धार्मिक विधी, कलशारोहण सोहळा, दुपारी महाप्रसाद, सायंकाळी पाच वाजता सत्कार सोहळे, रात्री ९वा दिंडी गोफ नृत्य कार्यक्रम.शुक्रवार१मार्च रोजी सकाळी१०वाजता सत्यनारायण महापूजा , सायंकाळी भजने रात्री ट्रिक सीनदशावतारी नाट्यप्रयोग सादर होणार आहे.तरी या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घेण्याचे आवाहन जिर्णोद्धार समिती अध्यक्ष रघुवीर घाडीगांवकर, सचिव सीताराम घाडीगांवकर, खजिनदार संतोष घाडीगांवकर यांनी केले आहे.