पंचायत समिती देवगड येथे संत गाडगेबाबा जयंती साजरी

देवगड,दि.२३ फेब्रुवारी
संत गाडगेबाबा यांची जयंती पंचायत समिती देवगड येथे गटविकास अधिकारी श्रीम .वृक्षाली यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली . यावेळी गटविकास अधिकारी उच्चस्तर वर्ग -१ वृक्षाली यादव यांच्या हस्ते संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पुजन करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी कक्ष अधिकारी संतोष बिर्जे , अधिक्षक मेधा राणे , अधिक्षक कुणाल मांजरेकर , विस्तार अधिकारी ( ग्रा.प ) अंकुश जंगले , वरीष्ट सहाय्यक विलास लोके ,कनिष्ठ सहाय्यक प्रमोद खिचडे , वरीष्ठ सहाय्यक शामल काळसेकर , कनिष्ठ सहाय्यक शेवंता ठाकरे , कनिष्ठ सहाय्यक प्रज्ञा सावंत , कनिष्ठ सहाय्यक एकनाथ बिले , Apo अनंत लाड, विजय फोंडेकर आदी उपस्थित होते .