लोकसभा निवडणुकीच्या पार्शवभूमीवर मतदारांना मतदान प्रक्रियेतील EVM मशीन व नवीन VVPAT मशीन कशी हाताळावी या बाबत जनजागृती

येत्या लोकसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेत EVM मशीन सोबत VVPAT मशीनचा वापर होणार

मालवण,दि.२३ फेब्रुवारी

येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्शवभूमीवर मतदारांना मतदान प्रक्रियेतील EVM मशीन व नवीन VVPAT मशीन कशी हाताळावी या बाबत मालवण तालुक्यात गेला दीड महिना तहसील कार्यालयाकडून विशेष कार्यक्रम राबविण्यात येत असून या अंतर्गत सर्व मतदान केंद्र व सार्वजनिक ठिकाणी जाऊन तेथील नागरिकांना या मशीनबाबत माहिती देऊन जनजागृती करण्यात येत आहे.

या जनजागृती कार्यक्रमात EVM व VVPAT मशीनद्वारे होणारे मतदान प्रक्रियेचे प्रात्यक्षिक दाखविण्यात येत आहे. याद्वारे VVPAT मशीन मध्ये मतदाराने केलेले मतदान योग्यरित्या होत असल्याची खात्री मतदारांना होत आहे. या मशीन मध्ये केलेल्या मतदानाची स्लिप त्या मतदाराला सात सेकंदापर्यंत दिसून येते तसेच मतदान योग्य होत असल्याचे मतदाराला समजते. येत्या लोकसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेत EVM मशीन सोबत VVPAT मशीनचा वापर होणार आहे.

वायरी भूतनाथ ग्रामपंचायत येथेही या मशीन बाबत जनजागृती करण्यात आली त्यावेळी मंडळ अधिकारी पिटर लोबो, मालवण तलाठी गौरव दळवी, वायरी तलाठी वसंत राठोड, देवबाग तलाठी नवीन राठोड, वायरी उपसरपंच प्राची माणगावकर तसेच ग्रामस्थ व मतदार उपस्थित होते.