न्यायालयाच्या कोनशिल समारंभाच्या उदघाटन प्रसंगाची जय्यत तयारी

देवगड न्यायालयाची ही नवीन इमारत शहराच्या देखण्या स्थळांत भर घालणारी…

देवगड, दि.२३ फेब्रुवारी

सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे देवगड
न्यायालयाच्या कोनशिल समारंभाच्या उदघाटन प्रसंगाची जय्यत
तयारी करण्यात आली आहे. ४ हेलिपॅड व न्यायालयाकडे जाणा-या
रस्त्यांची डागडुजी करुन परिसर स्वच्छ करण्यात आला आहे.
शासकिय विश्रामगृहाचे देखील सुशोभिकरण करण्यात आले आहे.
देवगड तालुका दिवाणी न्यायाधीश आणि न्यायदंडाधिकारी प्रथम
वर्ग न्यायालयाच्या नूतन इमारतीचा कोनशीला समारंभ उद्या २४
फेब्रुवारी रोजी संपन्न होत आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते आणि
केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांच्या प्रमुख उपस्थितीत, उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नितीन
बोरकर यांच्या अध्यक्षतेखाली कोनशीला समारंभ संपन्न होणार
आहे.उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देवेंद्रकुमार
उपाध्याय,पालकमंत्री रवींद्र चव्हाण, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश
हेमंत गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती यावेळी असणार आहे.
सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून देवगड
तालुका न्यायालयाच्या नूतन इमारतीचे देवगड तालुकावासीयांचे
स्वप्न कैक वर्षानंतर साकारत आहे. देवगड शहर पर्यटनाच्या
नकाशावर झळकत असतानाच देवगड न्यायालयाची ही नवीन
इमारत शहराच्या देखण्या स्थळांत भर घालणारी होणार आहे. वस्तू
शास्त्राचा आदर्श नमुना म्हणून या इमारतीकडे पाहिले जाईल.
सार्वजनिक बांधकाम कणकवली विभागाचे कार्यकारी अभियंता
अजयकुमार सर्वगोड यांनी अधीक्षक अभियंता छाया नाईक
अभियंता राजभोज यांच्या मार्गदर्शनाखाली देवगड तालुका
न्यायालय इमारतीचा सर्वांगसुंदर आराखडा बनवून घेतला आहे.

अभियंता राजभोज यांच्या मार्गदर्शनाखाली देवगड तालुका
न्यायालय इमारतीचा सर्वांगसुंदर आराखडा बनवून घेतला आहे.
सार्वजनिक बांधकामच्या माध्यमातून तब्बल २८.२१ कोटी निधी
खर्चून ४ मजली सुबक अशी देवगड न्यायालयाची ही इमारत उभी
राहणार आहे. ज्यूडीशीअल ऑफिस, जज चेंबर, कोर्ट हॉल,
कॉन्फरन्स हॉल, लोकअदालत हॉल, कोर्ट चेंबर, ऍडव्होकेट चेंबर
आदी सह अन्य सुविधा या नूतन इमारती मध्ये असणार आहेत.
एकंदरीत देवगड शहराच्या पर्यटन दृष्ट्या विकासात भर घालतानाच
देवगड तालुकवासीयांच्या अपेक्षा पूर्ती चा बिंदू देवगड तालुका
न्यायालयाची इमारत ठरेल हे नक्की.