कलमठ बाजारपेठ शाळा तालुक्यात मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान प्रथम…

कणकवली दि .२३ फेब्रुवारी(भगवान लोके)

कणकवली तालुक्यात कलमठ बाजारपेठ शाळेचा
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान प्रथम क्रमांक आला आहे.त्यासाठी ३ लाखाचे बक्षीस प्राप्त झाले आहे. तसेच जिल्हा स्तरीय स्पर्धेमध्ये या शाळेचे परीक्षण झाले आहे,अशी माहिती सरपंच संदीप मेस्त्री यांनी दिली.

या शाळेसाठी मेहनत घेणारे मुख्याध्यापक ,सर्व शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती, पालकांचे, ग्रामपंचायत सहकाऱ्यांचे योगदान असल्याचे श्री. मेस्त्री यांनी म्हटले आहे.