अटल सेतूच्या उदघाटन समारंभाचेवेळी पंतप्रधान ना. नरेंद्र मोदी यांनी आपले भाषण आवरते घेतले आणि तडकाफडकी निघून

0

मुंबई,दि.१३ जानेवारी
अटल सेतूच्या उदघाटन समारंभाचेवेळी पंतप्रधान ना. नरेंद्र मोदी यांनी आपले भाषण आवरते घेतले आणि ते तडकाफडकी निघून गेले. त्यानंतर मोदींनी असे का केले असावे याची जोरदार चर्चा सुरु झाली. आता नेमके कारण समोर आले आहे. ना. मोदींनी या समुद्र सेतूवरुन गाडीने प्रवास केला व नंतर ते कार्यक्रमात आले. सुरुवातीला ना. अजित पवार, ना. देवेंद्र फडणवीस व ना. एकनाथ शिंदे यांची भाषणे झाली. त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली. सर्वात शेवटी ना. मोदी भाषणाला उभे राहिले. त्यांनी नेहमीच्या पध्दतीने भाषण केले. मात्र शेवटच्या टप्प्यात त्यांनी भाषण आवरतं घेतले व ते तातडीने बाहेर पडले. थेट प्रक्षेपण सुरु होते, काय झाले ते कुणालाच समजले नाही.चर्चांना उधाण आले. चौकशीअंती समजले की ६.०२ वा.पर्यंत मोदींनी हेलिकॉप्टरमध्ये बसणे आवश्यक होते. परंतु त्यांचे भाषण ६.०४ पर्यंत चालले. नियोजित कार्यक्रमानुसार ५.४५ वा. त्यांचे भाषण संपणे आवश्यक होते. सुर्यास्तापूर्वी हेलिकॉप्टरला टेक ऑफ घेणे आवश्यक असल्याने मोदीनी तातडीने भाषण आवरते घेऊन तडकाफडकी निघाले हे आता स्पष्ट झाले आहे.