माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर यांची श्रद्धांजली
मालवण,दि .२३ फेब्रुवारी
एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणुन काम करणारे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी हे आज आपल्यातून निघून गेले आहेत कोकण विकासात विशेषतः मालवणच्या विकासात महत्वपूर्ण योगदान देणारे जोशी सर यांचे आपल्यातून निघून जाणे ही आमच्या सारख्या शिवसैनिकांना निश्चितच मनाला चटका लावणारी आहे पंतांची उणीव पक्षास निश्चितच भासेल. अशा शब्दात शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर यांनी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना श्रद्धांजली अर्पण केली.
राज्याचे माजी मुख्यमंत्री, लोकसभेचे माजी अध्यक्ष तथा शिवसेना नेते मनोहर जोशी यांचे आज पहाटे निधन झाले. जोशी सर शिवसेनेच्या पहिल्या फळीतील नेते होते. मराठी मुलांना व्यावसायिक कौशल्य शिकवण्याचे त्यांचे वर्ग प्रसिद्ध होते. सरांच्या जाण्यामुळे शिवसेनेच्या सुरुवातीपासूनच्या इतिहासाचा साक्षीदार पडद्याआड गेला आहे जोशी सरांचे शिवसेनेतील योगदान हे महत्वपूर्ण आहेच शिवाय मालवणच्या विकासातही त्यांनी दिलेले योगदान विसरता येणार नाही मालवणच्या किल्ले सिंधुदुर्ग वरील भगव्या ध्वजाचे आरोहण,मालवणची शंभर टक्के अनुदानातून मंजूर केलेली नळपाणी योजना या आणि अशा कितीतरी गोष्टी या सरांच्या कार्यकिर्तीची आठवण आहेत असे सांगत जोशीसंराच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला. त्यांच्या जाण्याने ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो, कुटुंबीयांना हे दुःख झेलण्याची शक्ती देवो, अशी प्रार्थना करत तमाम शिवसैनिकांच्या वतीने श्री. गोवेकर यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.