मंत्री केसरकर यांच्या माध्यमातून वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेअंतर्गत विधानसभा मतदार संघासाठी २ कोटी ५१ लक्ष रुपयांची कामे मंजूर

सावंतवाडी दि.२३ फेब्रुवारी 
राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री नाम. दीपक केसरकर यांच्या माध्यमातून वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेअंतर्गत सावंतवाडी विधानसभा मतदार संघासाठी २ कोटी ५१ लक्ष रुपयांची कामे मंजूर करण्यात आली आहेत अशी माहिती माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांनी दिली.

महाराष्ट्र राज्यात विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्गात अनेक जाती जमाती असून अद्यापही भटकंती करून स्थलांतरित स्वरूपाचे जीवन जगत आहेत.सावंतवाडी ,दोडामार्ग ,वेंगुर्ले तालुक्यात अनेक धनगर वस्त्या व इतर वस्त्या असून या वस्त्यांमध्ये अनेक वर्षापासून हे लोक वास्तव्य करत आहेत .बहुसंख्य वस्त्या ह्या डोंगर कपारीत स्थायिक झालेले आहेत. या प्रवर्गातील समाज ज्या ठिकाणी वास्तव्यास आहे त्याच ठिकाणी या समाजाला स्थिर जीवन जगता यावे याकरिता त्यांना अत्यावश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध होण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा सावंतवाडी वेंगुर्ला दोडामार्ग मतदारसंघाचे आमदार नाम. दीपक केसरकर यांच्या प्रयत्नातून व पाठपुराव्याने तब्बल ३२ वस्त्यांसाठी विविध विकास कामांसाठी २ कोटी ५१ लाख निधी मंजूर झालेला आहे .

महाराष्ट्र शासनाच्या वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेअंतर्गत सन 2023- 24 साठी या कामांना मान्यता मिळाली असून त्यासाठी संबंधित यंत्रणेकडे निधी वितरित करण्यात आलेला आहे. यामध्ये मतदारसंघातील कामांचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे.सावंतवाडी तालुक्यातील कामे-
कुणकेरी रेवीचे भाटले ते आयनाचे गाळू रस्ता मजबुतीकरण करणे .रक्कम रुपये १० लक्ष.
माडखोल वेंगुर्ले बेळगाव मुख्य रस्ता ते माडखोल धनगरवाडी पर्यंत जाणारा रस्ता नूतनीकरण करणे . रक्कम रुपये १० लक्ष.
आंबोली गडदू धनगरवाडी येथील रस्ता मजबुतीकरण करणे . रक्कम रुपये १० लक्ष.
केसरी धनगर वाडी येथे सेवा भवन बांधकाम करणे. रक्कम रुपये २० लक्ष. केसरी आलाठी धनगरवाडी अंतर्गत रस्ते मजबुतीकरण करणे. रक्कम रुपये ४ लक्ष.विलवडे धनगर वाडी ते गणपती विसर्जन स्थळ पर्यंत जाणारा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे. रक्कम रुपये १० लक्ष. डिंगणे धनगरवाडी ग्रा मा ११६ रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे. रक्कम रुपये ५ लक्ष.आंबेगाव रस्ता ,(सटवाडी) माडखोल ते नवलू पाटील यांच्या घरापर्यंत जाणारा रस्ता खडीकरण/ डांबरीकरण करणे .रक्कम रुपये ५ लक्ष.चौकुळ चुरणीची मूस धनगरवाडी येथे संत रामराव महाराज सभागृह बांधणे. रक्कम रुपये १५ लक्ष मंजूर करण्यात आले आहेत.

दोडामार्ग तालुक्यातील कामे – आडाळी धनगरवाडी येथे सेवा भवन बांधणे. रक्कम रुपये १५ लक्ष. कुडासे मुख्य रस्ता ते तिलारी कालवा पर्यंत रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे. रक्कम रुपये १० लक्ष. कुडासे धनगरवाडी येथे स्ट्रीट लाईट बसविणे. रक्कम रुपये ५ लक्ष. केर निडलवाडी प्राथमिक शाळा गावडेवाडी तक परमेकडे जाणाऱ्या रस्त्यास दोन्ही बाजूस गटार बांधणे .रक्कम रुपये ८ लक्ष. भेकुर्ली तळकट कडे जाणारा रस्ता ते धनगर वस्ती रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे .रक्कम रुपये १० लक्ष.भेकूर्ली धनगर वस्ती येथे सोलर हायमास्ट बसविणे. रक्कम रुपये ४ लक्ष. उगाडे धनगर वाडी येथे सोलर हाय मास्ट बसविणे. रक्कम रुपये ४ लक्ष.
उगाडे धनगरवाडी अंतर्गत रस्त्याचे काँक्रिटीकरण करणे .रक्कम रुपये ८ लक्ष.
झरेबांबर कालव्यापासून नाना जंगले यांचे घरापर्यंत जाणारा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे. रक्कम रुपये ७ लक्ष.
झरेबांबर येथील सोनू बाबा तटे घर ते विठू बाळू झोरे घरापर्यंत जाणारा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे. रक्कम रुपये १० लक्ष.
सोनावल धनगरवाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे .रक्कम रुपये १० लक्ष.
मनेरी येथील आंबोली मुख्य रस्ता ते धनगरवाडी रस्ता नूतनीकरण करणे व मोरी बांधणे. रक्कम रुपये १० लक्ष. मनेरी येथे सोलार हाय मास्ट बसविणे .रक्कम रुपये ४ लक्ष.वझरे येथील तळेखोल मुख्य रस्ता ते वझरे धनगरवाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे .रक्कम रुपये ८ लक्ष.साटेली भेडशी धनगरवाडी येथील तिलारी मुख्य रस्ता ते विजय शिंदे यांच्या घरापर्यंत रस्त्यावर सोलर हायमास्ट बसविणे. रक्कम रुपये ४ लक्ष.
कुंब्रल मोईचीवाडी धनगरवाडी विंधन विहीर बांधणे. रक्कम रुपये ३ लक्ष.आडाळी धनगर वाडी येथे बोअरवेलवर नळ पाणी योजना करणे .रक्कम रुपये ५ लक्ष. मनेरी येथे आंबेली मुख्य रस्त्यापासून ते विजय झोरे व नारायण झोरे यांच्या घरापर्यंत जाणारा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे .रक्कम रुपये १० लक्ष मंजूर करण्यात आले आहेत.
वेंगुर्ले तालुक्यातील कामे -खानोली धनगरवाडी येथे सेवा भवन बांधणे . रक्कम रुपये ५ लक्ष .
कोचरा मठ गोसावी वाडी येथे सोलर स्ट्रीट लाईट बसविणे . रक्कम रुपये २ लक्ष.
भोगवे धनगरवाडी येथे सोलर स्ट्रीट लाईट बसविणे. रक्कम रुपये ४ लक्ष.
भोगवे गोसावी वाडी येथे रस्ता डांबरीकरण करणे. रक्कम रुपये ८ लक्ष.
होडावडा वस्तीत जाणारा रस्ता डांबरीकरण करणे .रक्कम रुपये ८ लक्ष मंजूर करण्यात आले आहेत

या वाडी वस्त्यांवर मान.दीपक केसरकर यांच्या माध्यमातून ही कामे मंजूर झाल्याने त्या वाडी वस्तीतील सर्व लोकांनी, त्या गावच्या सरपंचांनी महाराष्ट्र राज्याचे लाडके शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री नामदार दीपक केसरकर यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करून धन्यवाद दिले आहेत असे माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांनी सांगितले.