कणकवली तहसीलदार कार्यालयात अप्पर जिल्हाधिकारी रवींद्र मठपती यांच्या उपस्थितीत बैठक ; केंद्रीय मंत्री नारायण राणे,आ.नितेश राणेंच्या सूचनेनुसार झाली बैठक
कणकवली दि.२३ फेब्रुवारी(भगवान लोके)
तळेरे लघु पाटबंधारे प्रकल्प १९९५ पासून सुरु आहे.मात्र,या ठिकाणच्या प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न अद्यापही प्रलंबित आहेत,याबाबत केंद्रीय मंत्री नारायण राणे,आ.नितेश राणेंच्या सूचनेनुसार कणकवली तहसीलदार कार्यालयात अप्पर जिल्हाधिकारी रवींद्र मठपती यांच्या उपस्थितीत बैठक झाली . त्यावेळी श्री.मठपती यांनी प्रकल्पग्रस्तांचे म्हणणे ऐकून घेत प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडवल्या जातील असे आश्वासन दिले.
भूसंपादन ,पुनर्वसन, व लघु पाटबंधारे विभागाचे अधिकारी देखील उपस्थित होते. या पाटबंधारे प्रकल्पग्रस्त कुटुंब १९६ आहेत, त्यापैकी १०९ कुटुंबांना पुनर्वसन अनुदान मिळाले आहे. अन्य ८७ कुटुंबाना अद्यापही अनुदान मिळालेले नाही.त्यापैकी ७५ जणांच्या नावावर बांधकाम किंवा जमीन संपादित झालेली दिसत नाही. उर्वरित १२ लोकांची कागदपत्रे तपासून त्यांना त्याचा मोबाईल क्रमांक दिला जाणार आहे
ज्या प्रकल्पग्रस्तांना अनुदान मिळाले नाही त्यांनी अर्ज करावा .आवश्यक कागदपत्राची पूर्तता करावी, त्यांना देखील आपण योग्य पद्धतीने मोबदला मिळवून देण्यासाठी प्रशासन सहकार्य करेल.प्रकल्पग्रस्तांनी तांत्रिक काही चुका झाल्या असतील तर चर्चा करावी असे आश्वासन रवींद्र मठपती यांनी दिले.
तळेरे वाघाचीवाडी लघु पाटबंधारे प्रकल्पग्रस्त म्हणाले,आम्ही गेली २५ वर्षे आम्ही हालअपेष्टा सहन केल्या, शासनाकडे वेळोवेळी कागदपत्रांचा पाठपुरावा केला.
पण कोणताही तोडगा निघत नाही. त्यामुळे आता शासनाने आमच्या म्हणणे ऐकून आमच्या मागण्यांवर योग्य तोडगा काढावा.आम्हाला न्याय मिळवून द्यावा ,अशी मागणी प्रकल्पग्रस्तांनी केली.
यावेळी बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी रवींद्र मठपती, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता विजय थोरात, उपजिल्हाधिकारी भूसंपादन आरती देसाई, लघु पाटबंधारे विभाग ओरस कार्यकारी अभियंता महादेव कदम, कणकवली तहसीलदार दिक्षांत देशपांडे, मंगेश माणगावकर ,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत,
माजी सभापती दिलीप तळेकर, सरपंच हनुमंत तळेकर, माजी सरपंच चंद्रकांत तळेकर, उपसरपंच शैलेश सुर्वे, राजू जठार ,चंद्रकांत तळेकर, प्रवीण वरूनकर, बाळा कदम, निलेश तळेकर, प्रकल्पग्रस्त समिती सदस्य सचिव विष्णू भोगले, राजीव वळंजू, चंद्रकांत चव्हाण,मोहन भोसले, रवी चव्हाण, मधुकर चव्हाण,विश्वनाथ चव्हाण, सुनील चव्हाण, राजेश भोगले,भूषण भोगले ,पांडुरंग भोगले ,मारुती भोगले, महेश भोगले, अरविंद पवार, अशोक जगताप, सुभाष कुपले यांच्यासह प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.