मोती तलावाच्या हार्ट ऑफ द सिटी म्हणून मिरवणारी ‘तुतारी”आज शरदचंद्र पवार राष्ट्रवादीची निशाणी बनली-माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर

सावंतवाडी दि.२३ फेब्रुवारी
सावंतवाडीच्या मोती तलावाच्या हार्ट ऑफ द सिटी म्हणून मिरवणारी ‘तुतारी” आज शरदचंद्र पवार साहेबांच्या राष्ट्रवादीची निशाणी बनली आहे अशी प्रतिक्रिया माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी व्यक्त केली.

ते म्हणाले,आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी मोती तलावाच्या मध्यभागी असलेल्या कवी केशवसुत कट्ट्या च्या मार्गाचे तसेच ऑब्झर्वेशन डेग चे उद्घाटन केलं होत तीच तुतारी आज राष्ट्रवादीची निशाणी बनली आहे ,हा योगायोग असून आता ही तुतारी वाजणारच आहे असे त्यांनी म्हटले आहे.