कणकवलीत रेल्वेच्या धडकेत अज्ञात तरुणाचा मृत्यू

कणकवली दि .२३ फेब्रुवारी

कोकण रेल्वे मार्गावर कणकवली नागवेच्या दिशेने जाणाऱ्या गोटणीच्या आंब्याच्या झाडाजवळ रेल्वे ट्रॅकवर जनशताब्दी एक्सप्रेसच्या धडकेत अज्ञात तरुणाचा मृत्यू झाला.हा अपघात सुमारे सायंकाळी ५.४६ वाजण्याच्या सुमारास घडला.मृत तरुणाची अद्याप ओळख पटलेली नाही.

सदर मृत तरुणाच्या बाजूला चप्पल आढळले आहे,तसेच गळ्यात काळा दोरा आहे. त्याच्या अंगावर फुल पँट ,पिवळसर रंगाचे फुल शर्ट, रंग काळा सावळा आहे. अंदाजे वय ४० ते ४६ असून त्याच्याजवळ रेल्वेचे प्लॅटफॉर्म तिकीट देखील आढळले असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

मडगाव ते मुंबई जाणाऱ्या जनशताब्दी एक्सप्रेस खाली नागवे गाव हद्दीत ४० ते ४५ वर्षाच्या तरुणाचा अपघातात जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी त्या तरुणाच्या मृतदेहाचे अनेक तुकडे विखुरले गेले होते. जनशताब्दी एक्सप्रेसच्या चालकाने याबाबतची माहिती नांदगाव रेल्वे स्टेशन मास्तर यांना दिली. तर नांदगाव रेल्वे स्टेशन मास्तर यांनी कणकवली स्टेशन मास्तर यांना कळवले. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान सायंकाळी कणकवली पोलीस नागवे रेल्वे ट्रॅक येथे जाऊन घटनेची पंचनामा केला.उशिरापर्यंत रेल्वे धडकेत मृत पावलेल्या तरुणाची ओळख पटली नव्हती. याबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक बापू खरात करीत आहेत.