जि.प.प्रशासनाचा मनमानी कारभारच कारणीभूत आहे असा गंभीर आरोप शिवसेना तालुकाप्रमुख विलास साळसकर
देवगड,दि.२३ फेब्रुवारी
मुदत संपत आली तरी देवगड तालुक्यातील जलजीवन योजनेच्या कामाची स्थिती गंभीर असून काही ठीकाणी अर्धवट स्थितीत तर काही ठीकाणी कामांना अद्याप सुरूवात झाली नसल्याचे चित्र आहे याला जि प.प्रशासनाचा मनमानी कारभारच कारणीभूत आहे असा गंभीर आरोप शिवसेना तालुकाप्रमुख विलास साळसकर यांनी केला.रत्नागिरी सिंधुदूर्ग लोकसभा मतदारसंघातून धनुष्यबाण चिन्हावर शिवसेनेचाच खासदारकीचा उमेदवार द्यावा अशी देवगड तालुका शिवसेनेची मागणी असल्याचेही साळसकर यांनी पत्रकार परिषदेत सांगीतले.शिंदे शिवसेना वाढू नये यासाठी उबाठाबरोबरच सत्तेतील सहकारी असलेल्या भाजपाचेही प्रयत्न सुरू आहेत.मुख्यमंत्र्यांचा माध्यमातून निधी आणला मात्र उदघाटना वेळी शिवसेनेला डावलले जाते तसेच त्या ठीकाणी मुख्यमंत्र्याचा फोटो हि लावला जात नाही असा आरोप साळसकर यांनी केला.
देवगड तालुका शिववसेना संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परीषदेत शिवसेना तालुकाप्रमुख विलास साळसकर हे बोलत होते.यावेळी त्यांच्यासमवेत दिनेश गावकर उपस्थित होते. देवगड तालुक्यात जलजीवन योजनेच्या कामांची अवस्था फार गंभीर आहे.या कामांची मुदत ३१ मार्च २०२४ पर्यंत आहे.नंतर ही योजना बंद होणार आहे.परंतु लाखो रूपये खर्च करूनही या योजनेची कामे काही ठीकाणी अर्धवट स्थितीत तर काही ठ{काणी कामे सुरूच झाली नाही अशा स्थ{तीत आहेत याला जि प.प्रशासनाचा मनमानी कारभार कारणीभूत आहे असा आरोप साळसकर यांनी केला.या कामांची ५ टक्के लोकवर्गणीही भरण्यात आली नाही.कामांचे बोर्ड ४०० ते ५०० रूपये किंमतीचा साध्या बॅनरवर तयार करून लावण्यात आले आहेत.यासाठी ११ हजार रूपयांची तरतुद टेंडरमध्ये करण्यात आली आहे.या योजनेच्या कामांवर कोणाचेही न{यंत्रण नसून आठ ठीकाणी केलेल्या विहीरींना पाणी नाही म्हणून त्या बुजविण्यात आल्या मात्र त्याचे बील काढून देण्यात आले असा गंभीर आरोप साळसकर यांनी केला.
रत्नागिरी लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचाच असून येथील जनतेची नाळ ही शिवसेनेशी जोडलेली आहे.त्यामुळे धनुष्याबाण चिन्ह असलेला शिवसेनेचाच उमेदवार खासदारकीसाठी असेल.मात्रपक्ष असलेल्या भाजपची उमेदवारीसाठी चर्चा आहे मात्र देवगड तालुका शिवसेनेचीही या मतदारसंघासाठी शिवसेनेचाच उमेदवार हवा अशी मागणी आहे.भाजपा हा मोठा भाऊ असला तरी छोट्या भावाचा संसाराचा प्राधान्यक्रमाने विचार करावा व शिवसेनेचाच मतदारसंघ असल्याने या मतदारसंघात श{वसेना धनुष्यबाण चिन्ह असलेला खासदारकीचा उमेदवार द्यावा अशी मागणी साळसकर यांनी केली.यावेळी साळसकर यांनी उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेवरही जोरदार टीका केली.


