सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून रिंगणात राहण्याची हिंमत करणार नाहीत-खासदार विनायक राऊत

सावंतवाडी दि.२४ फेब्रुवारी
सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून आपला पराभव निश्चित असल्याची कल्पना असल्याने केंद्रीय मंत्री नारायण राणे सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून रिंगणात राहण्याची हिंमत करणार नाहीत असे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी म्हटले आहे.

नारायण राणे केंद्रीय मंत्री असूनही लोकसभा निवडणूक लढविण्यात कच खात आहेत. केंद्रीय केंद्रीय मंत्री असून सुद्धा ते रिंगणात राहत नाहीत हेच पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचे अपयश आहे, असे खासदार विनायक राऊत यांनी सांगितले. ते म्हणाले,रणांगणातून पळ काढणारे नारायण राणे यांना पराभव समोर दिसत असल्याने ते रिंगणातून पळ काढतील असे प्रतिक्रिया खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केली आंबोली उपोषण स्थळी भेट दिल्यानंतर ते पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देत होते.
राणे लोकसभा निवडणुकीत उडी घेतील याबद्दल शंका आहे जिंकून येण्याची शाश्वती नसल्यामुळे ते रिंगणात उतरणार नाही असे देखील खासदार विनायक राऊत यांनी सांगून त्यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर सविस्तर बोलता येईल असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ संपर्क प्रमुख शैलेश परब, समन्वयक बाळा गावडे , चंद्रकांत कासार,बाळु माळकर आदी उपस्थित होते.