संविता आश्रमातील बांधवांकडून पणदूर तिठा येथे स्वच्छता मोहिम

कणकवली दि.२४ फेब्रुवारी (भगवान लोके)

संत गाडगेबाबांनी आयुष्यभर हाती खराटा घेवून गावेच्या गावे स्वच्छ केली.स्वतःच्या कृतीतून बाबांनी समाजाला सार्वजनिक स्वच्छतेचा संदेश दिला. गाडगेबाबांच्या २३ फेब्रुवारी जयंतीच्या अनुषंगाने पणदूरच्या संविता आश्रमातील बांधवांनी पणदूर तीठा परिसर व ग्रामपंचायत कार्यालया समोरील मैदानात तीन तास स्वच्छता मोहिम राबवून संत गाडगेबाबांना कृतीतून अभिवादन केले.

जीवन आनंद संस्था स्त्यावरील निराधार, वंचित मानसिक व शारिरीक दृष्टीने आजारी असलेल्या बांधव,निराधार वयोवृध्द नागरिक इ.च्या पुनर्वसनासाठी आश्रम आणि शेल्टर होमद्वारे कार्यरत आहे..
संस्थेचे सिंधुदुर्ग, मुंबई व गोवा येथील निराधारांसाठीचे आश्रम आणि शेल्टर होम हे जनतेच्या पाठिंब्यावर सुरू आहेत.आणि म्हणून आश्रमांतील बांधव आणि संस्थेतील सेवा कार्यकर्ते व कार्यकारी मंडळ हे समाजाचे रूणी आहेत. अशी भावना मनात ठेवून आश्रमकडून सातत्याने ठिकठिकाणी स्वच्छता मोहिमांचे आयोजन करण्यात येते.
जीवन आनंद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदिप परब,विश्वस्त किसन चौरे, किन्लोस येथील आश्रामातील ज्योती आंगणे ,सचिन नाईक, संविता आश्रमचे वाहनचालक केविन डिसूझा यांचा स्वच्छता मोहिमेत सहभाग होता.