मालवण,दि.२४ फेब्रुवारी
महाराष्ट्र नवनिर्माण सेना मालवण शहर कार्यकारिणी तसेच तालुक्यातील विभागवार शाखाध्यक्ष, विभाग अध्यक्ष स्तरावरील पहिल्या टप्प्यातील कार्यकारणी जिल्हाध्यक्ष धीरज परब व उपजिल्हाध्यक्ष गणेश वाईकर यांच्या उपस्थितीत तालुकाध्यक्ष प्रितम गावडे यांनी जाहीर केली.
मालवण शासकीय विश्रामगृह येथे शनिवारी मनसे पदाधिकारी यांची बैठक संपन्न झाली. नवनियुक्त पदाधिकारी यांना नियुक्तीपत्र देण्यात आली. यावेळी जिल्हा सचिव बाळा पावसकर, सुचिता परब यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
मनसेच्या मालवण तालुक्यातील नवानियुक्त पदाधिकारी मध्ये चौके शाखाध्यक्ष प्रतीक गावडे, नांदरुख शाखाध्यक्ष ओमकार चव्हाण, साळेल गटअध्यक्ष रोहन तावडे, कुणकावळे शाखाध्यक्ष राहुल मोंडकर, कुंभारमाठ शाखाध्यक्ष मोहिते, पळसंब शाखाअध्यक्ष राकेश पुजारे, पळसंब उपशाखाअध्यक्ष संतोष परब, पळसंब वार्ड अध्यक्ष प्रफुल्ल लाड, पळसंब वार्ड अध्यक्ष दक्षता सावंत, पळसंब वार्ड अध्यक्ष तुषार पुजारे, नांगरभाट शाखाध्यक्ष श्री गावडे, पेंडूर सिद्धेश परब, आचरा प्रफुल्ल माळकर, पोईप विभागअध्यक्ष कुणाल मालवदे, पेंडूर शाखाध्यक्ष सौरभ राऊळ, माळगाव शाखाध्यक्ष हर्षद परब,मालवण गटअध्यक्ष नितीन राठोड, मालवण गट अध्यक्ष हर्ष जोशी, मालवण गट अध्यक्ष साईश किर, मालवण गटअध्यक्ष चिन्मय कुणकावळेकर, मालवण वार्ड अध्यक्ष लौकिक मेथर, मालवण वार्ड अध्यक्ष तथागत मालवणकर यांची नियुक्ती करण्यात आली.
मालवण तालुका अध्यक्ष प्रितम गावडे यांनी मालवण तालुक्यात येत्या काळातही सर्व विभाग वार पदाधिकारी नियुक्त करण्यात येणार असल्याचे सांगितले. सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचारानुसार कार्यरत राहणार आहेत असे धीरज परब यांनी सांगितले.