बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी,विकास संस्थांचे चेअरमन यांची उपस्थिती
कणकवली दि.२४ फेब्रुवारी(भगवान लोके)
भारतातील सहकार क्षेत्र ‘सहकार से समृद्धी’ हे लक्ष्य घेऊन आंतरराष्ट्रीय पातळीवर झेप घेण्यासाठी सज्ज होत आहे. आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत देशातील प्राथमिक विकास संस्थाना स्वावलंबी बनविण्यासाठी देशातील २५००० विकास संस्थांचे संगणकीकरण करण्यात आले असून या कामकाजाचे उद्घाटन पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री तसेच सहकार मंत्री श्री. अमित शहा यांच्या उपस्थितीत आज २४ फेब्रुवारी २०२४ रोजी दिल्ली येथे झाले. या प्रसंगी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे हे उपस्थित राहीले.तसेच फोंडाघाट, मातोंड, कर्याद नारुर या विकास संस्थांचे अध्यक्ष सहभागी झाले होते.