मिलाग्रीस हायस्कूलच्या विराज नंदकिशोर राऊळ आणि कृष्णा महेश पास्ते या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक

0

सावंतवाडी,दि.१३ जानेवारी
पणदूर येथे झालेल्या ५१ व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात विज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धेतील प्राथमिक गटात सावंतवाडी येथील मिलाग्रीस हायस्कूलच्या विराज नंदकिशोर राऊळ आणि कृष्णा महेश पास्ते या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक फटकाविला.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्यावतीने आयोजित जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन कुडाळ तालुक्यातील पणदूर येथील शिवाजी इंग्लिश स्कूल व दादासाहेब तिरोडकर कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित करण्यात आले होते. या विज्ञान प्रदर्शनात विज्ञान प्रतिकृती, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, प्रश्न मंजुषा स्पर्धा अशा स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. त्यात प्रश्नमंजुषा स्पर्धेतील प्राथमिक गटात सावंतवाडी येथील मिलाग्रीस हायस्कूलच्या विराज नंदकिशोर राऊळ आणि कृष्णा महेश पास्ते या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक फटकाविला.
यावेळी कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांच्याहस्ते विराज राऊळ आणि कृष्णा पास्ते याना पारितोषिक देऊन गौविण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी प्रदीपकुमार कुडाळकर, वेताळ बांबर्डे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रघुनाथ गावडे, सचिव नागेंद्र परब, मुख्याध्यापक संजय मालवणकर, पर्यवेक्षक मिलिंद कर्पे, श्री. मेंगानी, श्रीम अवटे, एस. डी. गावकर आदी अधिकारी, शिक्षक, व विद्यार्थी उपस्थित होते.
विज्ञान प्रदर्शनातील विराज राऊळ आणि कृष्णा पास्ते या दोन्ही विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल त्यांचे मिलाग्रीस हायस्कूलचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालढाणा, उपमुख्याध्यापिका सिस्टर मेबल कार्व्हालो, पर्यवेक्षिका सौ. मेघना राऊळ आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.