” मधुमेह, व्यसनमुक्ती दूत’ पुरस्कार श्री भिकाजी कृष्णा सावंत यांना जाहीर “

कोल्हापूर,दि.२० ऑगस्ट
गाळेल व मुंबई येथील सामाजिक कार्यकर्ते श्री भिकाजी कृष्णा सावंत यांना समर्थ सोशल फाउंडेशन व न्यूट्रीफील हेल्थ प्रा. लि., कोल्हापूर यांच्या वतीने संस्थेचा मानाचा मानला जाणारा *‘राज्यस्तरीय मधुमेह व व्यसनमुक्ती दूत पुरस्कार -२०२५’ जाहीर झाला आहे.

२०१५ पासून देशभर मधुमेहमुक्ती, व्यसनमुक्ती, रोगमुक्ती, बालसंरक्षण व वेदनामुक्ती या क्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्थेच्या मोहिमेत श्री भिकाजी कृष्णा सावंत यांनी सक्रिय सहभाग घेऊन देशात तसेच परदेशात हजारो लोकांना आरोग्य मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव म्हणून हा सन्मान देण्यात येणार आहे.

हा पुरस्कार वितरण समारंभ सप्टेंबर – 2025 ह्या महिन्यात कोल्हापूर येथे होणार असून, श्री भिकाजी कृष्णा सावंत ह्यांचा समाजाच्या सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.