कणकवली दि.२४ फेब्रुवारी(भगवान लोके)
कणकवली पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांनी गेल्या महिन्यातच २६ जानेवारीला पदभार स्वीकारला होता.एका महिन्यातच कणकवली पोलीस निरीक्षक मारुती ज्ञानदेव जगताप लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा ठाणे ग्रामीण येथे बदली झाली आहे.त्याच्यासोबत जिल्ह्यातील एकूण ५ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत.
लोकसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ चे अनुषंगाने संदर्भिय पत्रात दिलेल्या मार्गदर्शक सुचनांप्रमाणे कोंकण परिक्षेत्रातील निःशस्त्र पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांबाबत निर्णय घेण्यासाठी परिक्षेत्रीय पोलीस आस्थापना आज मंडळाची बैठक झाली. या बैठकीत कोकणातील काही पोलीस निरीक्षकांची बदल्या करण्यात आल्या आहेत.
त्यामध्ये पोलीस निरीक्षक अतूल माधवराव जाधव यांची सिंधुदुर्ग येथून रत्नागिरी,पोलीस निरीक्षक समशेर हयातखाँ तडवी यांची ठाणे ग्रामीण येथून सिंधुदुर्ग,पोलीस निरीक्षक तानाजी महादेव नारनवर यांची रायगड येथून सिंधुदुर्ग,पोलीस निरीक्षक भरत गोविंद धुमाळ यांची सिंधुदुर्ग येथून रायगड ,पोलीस निरीक्षक सुरेश ठाकूर गावित यांची सिंधुदुर्ग येथून ठाणे ग्रामीण,पोलीस निरीक्षक प्रदीप अरुण पोवार यांची सिंधुदुर्ग येथून रायगड अशी बदली झाली आहे.