कुणकेश्वर या ठिकाणी परिट समाज स्नेह मेळावा वर्ष दुसरे जिल्हाध्यक्ष दिलीप जी भालेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला

देवगड, दि.२४ फेब्रुवारी
श्री संत गाडगे महाराज परीट समाज सेवा संघ देवगड यांच्या वतीने शुक्रवार दिनांक २३ फेब्रुवारी २४ रोजी श्री संत गाडगे महाराजांच्या १४८ व्या जयंतीनिमित्ताने देवगड तालुक्यातील कुणकेश्वर ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्हा परिट समाज स्नेह मेळावा वर्ष दुसरे जिल्हाध्यक्ष दिलीप जी भालेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला या कार्यक्रमाच्या निमित्ताने श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिर परिसर व समुद्रकिनारा ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात आले यावेळी ग्रामपंचायत कार्यालय कुणकेश्वर यांना श्री संत गाडगे महाराज यांची प्रतिमा श्री संत गाडगे महाराज समाज सेवा संघ देवगड यांच्या वतीने प्रदान करण्यात आली त्यानंतर नियोजित कार्यक्रम स्थळी अध्यक्षांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून गाडगे महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला व कार्यक्रमास सुरुवात झाली त्यावेळी सर्व मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले व दुपारी एक वाजता महाप्रसाद व्यवस्था करण्यात आली आहे व दोन-तीस वाजता महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम पार पडला त्यानंतर संत गाडगे महाराज कलानिकेतन आंदूर्ले प्रस्तुत गाडग्यातील शिदोरी हा संगीत कार्यक्रम संपन्न झाला व भ.भ.प. श्री विनायक आजगावकर यांचे कीर्तन सादर करण्यात आले या कार्यक्रमावेळी जिल्हाध्यक्ष दिलीप जी भालेकर देवगड तालुकाध्यक्ष विजय पाटील कणकवली तालुकाध्यक्ष श्री कामतेकर मालवण तालुक्याध्यक्ष मोहन वालकर वैभववाडी तालुका प्रतिनिधी शिवाजी कडू सावंतवाडी तालुका उपाध्यक्ष स्वप्निल कदम, कुडाळ तालुका प्रतिनिधी सदा अनावकर वेंगुर्ला तालुका प्रतिनिधी महेंद्र आरोलकर व दोडामार्ग तालुका प्रतिनिधी श्रीकृष्ण परीट व ग्रामपंचायत कुणकेश्वर सरपंच महेश ताम्हणकर तसेच देवगड तालुका कार्यकारणी संचालक वसंत मोहिते श्री दळवी गुरुजी शरद लाड वसंत शहाकार श्रीमती वैशाली हडकर सौ नीलिमा वालकर राजेंद्र वालकर नामदेव कातवणकर व श्री गणेश कुणकेश्वरकर उपस्थित होते या कार्यक्रमाचे नियोजन श्री संत गाडगे महाराज परिट समाज कुणकेश्वर यांनी केले या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद वालकर यांनी केले कार्यक्रम संपल्यानंतर श्री शाहाकर यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रम संपल्याचे जाहीर केले