‘दि गेम चेंजर नरेंद्र मोदी’ या पुस्तकाचे आ. नितेश राणे यांच्या हस्ते प्रकाशन
कणकवली दि.२५ फेब्रुवारी(भगवान लोके)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील दहा वर्षात खूप काही करून दाखवलं. २०३० पर्यंत आपला देश पहिल्या नंबर वर असला पाहिजे. त्या दृष्टीने आपण प्रयत्न केले पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे यासाठी प्रयत्न करा. नुसत्या घोषणा महत्वाच्या नाहीत. ईश्वराने आपल्याला चांगली बुद्धी दिली आहे त्याचा योग्य वापर करण गरजेचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही तेच स्वप्न आहे की प्रत्येकाच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे, असे प्रतिपादन ना. नारायण राणे यांनी केले. यावेळी त्यांनी पद्मश्री पुरस्कारप्राप्त परशुराम गंगावणे व पद्मश्री रमेश पतंगे यांना शुभेच्छा दिल्या.
कणकवली विधानसभा मतदार संघाचे आमदार नितेश राणे यांच्या शुभहस्ते ‘दि गेम चेंजर नरेंद्र मोदी’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी आमदार नितेश राणे मनोगत व्यक्त करताना म्हणाले, असे कार्यक्रम क्वांटिटीचे नसतात तर क्वालिटीचे असतात. हा कार्यक्रम सिंधुदुर्गच्या कानाकोपऱ्यात पोहोचला पाहिजे. भारतीय नागरिक म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींची कारकीर्द अनुभवत आहोत. गेल्या दहा वर्षापासून भारत देश म्हणजे काय हे जगाला कोणी दाखवले तर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच दाखवले. त्यामुळे नक्कीच या पुस्तकांचा प्रभाव पडेल. सर्व धर्म समभाव हे सर्वांना लागू हो होते की फक्त हिंदूंसाठी आहे. आपला देश हिंदू राष्ट्र आहे. जेव्हा फाळणी झाली तेव्हा बहुसंख्य मुस्लिम पाकिस्तानला राहतात म्हणून ते इस्लामिक राष्ट्र झाले. तसे भारत हिंदुबहुल असल्याने हिंदू राष्ट्र आहे. गांधी, नेहरूंनी त्याची ओळखच बदलण्याचा प्रयत्न केला. रमेश पतंगे यांचे पुस्तक वाचावे ते समजून घ्यावे. ज्या नेतृत्वाखाली काम करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे सामान्य नेतृत्व नाही. ७५ वर्षात जे झाले नाही ते दहा वर्षात करून दाखवले. राजकीय इच्छाशक्ती म्हणजे काय याचा अनुभव आणि अभ्यास करायचे असेल तर मोदींची दहा वर्षे केलेले काम अभ्यासावे असे आवाहन केले.
यावेळी पद्मश्री रमेश पतंगे म्हणाले, साधारणपणे या विषयावर आपण २५ ते ३० हुन अधिक पुस्तके अभ्यासली आहेत. त्यात एकही पुस्तक वाचून समाधान नाही. माहिती संकलनासाठी, आवश्यक गोष्टींसाठी मेहनत खूप महत्त्वाची आहे. लेखन क्षेत्रात अनेक विद्वान लोक आहेत. जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे राजकीय कामाची जबाबदारी आली तेव्हा त्यांनी मोठ्या जोमाने काम सुरू केली. तसेच त्यावेळी त्यांची सर्व नियोजन ठरलेली असायची. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनेक विषयांचा अभ्यास केला. ‘सबका साथ सबका विश्वास’ हे संघाचे विचार असल्याचे मत पद्मश्री रमेश पतंगे यांनी व्यक्त केले. ते पुढे म्हणाले, समाजाचा विकास प्रत्येक नागरिकाच्या परिश्रमाने होतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक योजना सुरू केल्या. तर समाजवाद व गांधीवाद एकत्र राहू शकत नाही. दरम्यान त्यांनी ‘दि गेम चेंजर नरेंद्र मोदी’ या पुस्तकाचे प्रकाशन प्रसंगी पुस्तक लिहितानाचे वेगवेगळे अनुभव, आठवणी, भाजपची निर्मिती कशी झाली याबाबत काही आठवणी, विचार व्यक्त केले.
यावेळी केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे यांनी या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली. तसेच यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याची माहिती दिली. तसेच उपस्थित असलेले पद्मश्री पुरस्कार प्राप्त परशुराम गंगावणे व रमेश पतंगे यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी केले.
यावेळी आमदार नितेश राणे, पद्मश्री पुरस्कारप्राप्त परशुराम गंगावणे, पद्मश्री रमेश पतंगे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता अजयकुमार सर्वगोड, विवेक मोताली, माजी जि. प. अध्यक्ष संजना सावंत, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, समीर प्रभूगावकर, प्रज्ञा ढवण, मेघा गांगण, संजना सदडेकर, पप्पू पुजारे, प्राची कर्पे, गणेश तळगावकर आदी उपस्थित होते.