डॉ.सदानंद मोरे यांचे “महाराष्ट्र काल, आज आणि उद्या” या विषयावरचे व्याख्यान

तळेरे, दि.२५ फेब्रुवारी

डॉ.सदानंद मोरे यांचे “महाराष्ट्र काल, आज आणि उद्या” या विषयावरचे व्याख्यान आज रविवार, दिनांक २५ फेब्रुवारी २०२४ रोजी सायंकाळी ठिक ५ वाजता स्वामी विवेकानंद सभागृह, प्रहार भवन, कणकवली येथे आयोजित करण्यात आले आहे.

डॉ. सदानंद मोरे यांच्याविषयी अगदी थोडक्यात : महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष, 88 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, ज्येष्ठ विचारवंत, संत तुकाराम महाराज यांचे वंशज, संत साहित्याचे अभ्यासक, लोकमान्य ते महात्मा, कर्मयगी लोकमान्य, महाराष्ट्राची लोकधारा, तुकाराम दर्शन अशा अनेक ग्रंथांचे लेखक, ‘महाराष्ट्र मंथन’ या चॅनलचे संपादक, विवेकवादी विचारसरणीचे प्रतिनिधी, ना उजवे ना डावे, सम्यक संतुलित, संयमी मांडणी करणारे व्यक्तित्व आणि महाराष्ट्रातील निःपक्षपाती विचारवंत अशी त्यांची ओळख आहे..

या वैचारिक मेजवानीत जिल्ह्यातील सर्व साहित्य रसिकांनी बहुसंख्येने सहभागी व्हावे असे आवाहन संवाद परिवाराचे संस्थापक डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी केले आहे.