सावंतवाडी दि.२५ फेब्रुवारी
शासकीय रेखाकला परीक्षा सन २०२३-२४ एलिमेंट्री व इंटरमिजिएट परीक्षेत आरपीडी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले आहे. एलिमेंट्री प्रविष्ट विद्यार्थी बत्तीस होते त्यातील ३१ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने ९७ टक्के निकाल लागला असून इंटरमिजिएट परीक्षेत ४५ विद्यार्थी प्रविष्ट झाले व ४५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले त्यामुळे शंभर टक्के विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले आहे
इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षा मध्ये ए श्रेणीमध्ये आठ विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले आहे यामध्ये कुणाल हरमलकर ,शिवानी लाड, समृद्धी सारंग, अथर्व मालवणकर, आदित्य परब, गौरेश राऊळ, सिद्ध राऊळ ,जनार्दन सावंत यांनी ए श्रेणीमध्ये यश प्राप्त केले आहे. तसेच २८ विद्यार्थ्यांनी बी श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत त्यामध्ये नम्रता बिले, आर्यन धोंड ,काजल गावडे, मंथन गवस, कुशाली गुरव, यश जाधव, आर्या कडू ,श्रेयस केनवडेकर, वेदांत सावंत, साहिल ताटे, आर्या ठाकूर, जान्हवी तिगडी, सृष्टी विचारे, ऋतुजा वावधाने, अनुष्का लोधी, नमिता मडव, ऋतुजा म्हाडगूत ,पवित्र मसुरकर, ध्रुवा नाईक,पूनम नाईक, शिरीष नार्वेकर ,बाळकृष्ण परब ,गौरव परब, समीक्षा पाटील ,अर्णा राणे ,मनीष राणे, स्नेहा राणे ,समीक्षा सावंत या विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले आहे.
एलिमेंट्री ड्रॉईंग मध्ये योगेश जोशी ने ए श्रेणीमध्ये यश प्राप्त केले असून अकरा विद्यार्थी बी श्रेणी उत्तीर्ण झाले आहेत त्यामध्ये शुभम पाटील, नक्षत्र वर्णेकर, सायली दळवी, दिव्येश परब, युगा मातोंडकर ,मैत्री सांगेलकर, नारायण साठेलकर, रामचंद्र सतावळेकर, प्रणव साधले, श्रावणी तळवणेकर , जान्हवी परब श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत
या सर्व विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विकास सावंत, सचिव व्हि बी नाईक, खजिनदार सी एल नाईक, शाळा समिती अध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर ,मुख्याध्यापक जे.वी धोंड, उपमुख्याध्यापक पी एम सावंत, पर्यवेक्षक बीआर चौकेकर, उपप्राचार्य डॉ. सुमेधा नाईक तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक आदींनी अभिनंदन केले आहे.