मालवण,दि.२५ फेब्रुवारी
भारतीय बौद्ध महासभा मालवण तालुका शाखा, महिला विभागातर्फे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांचा १२६ वा जयंत्युत्सव साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अपूर्वा पवार तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून संघमित्रा पळसंबकर उपस्थित होत्या. यावेळी प्रितम जाधव, नेहा काळसेकर, विनया कदम, स्नेहा पेंडुरकर, करुणा चौकेकर, तालुकाध्यक्ष सूर्यकांत कदम, सरचिटणीस रविकांत कदम, कोषाध्यक्ष संजय पेंडुरकर, मिलिंद पवार, संस्कार सचिव भगवान जाधव आदी उपस्थित होते.
यावेळी आचरा गाव शाखा महिला विभागातर्फे ‘मी रमाई बोलते’वर अभिनय सादरीकरण करण्यात आले. संघमित्रा पळसंबकर यांनी माता रमाई यांच्या कार्यावर विचार मांडले. सूर्यकांत कदम यांनीही स्त्रियांनी समाजात चांगले स्थान निर्माण होईल, असे काम केले पाहिजे, असे सांगितले. अपूर्वा पवार यांनी सावित्रीबाई व स्माई यांच्या लेकी म्हणून आदर्श निर्माण होईल, असे कार्य करूया, असे आवाहन केले. विशाखा कदम यांनी सुत्रसंचालन केले. आभार सुजाता वराडकर यांनी मानले.