मालवणात २७ रोजी प्रकट वाचन स्पर्धा

मालवण,दि.२५ फेब्रुवारी

कवी वि.वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस २७ फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरवदिन म्हणून साजरा केला जातो. मराठी भाषा गौरवदिनाचे औचित्य साधून बॅ नाथ पै सेवांगण संचलित साने गुरुजी वाचन मंदिरच्या वतीने ओझर विद्यामंदिर कांदळगावचे मुख्याध्यापक दिपक जाधव यांच्या सहकार्याने दि. २७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रकट वाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ पाच पारितोषिके देण्यात येणार आहेत. अशी माहिती बॅ नाथ पै सेवांगण संचलित साने गुरुजी वाचन मंदिरचे अध्यक्ष शैलेश खांडाळेकर यांनी दिली आहे.